आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब : 15 दिवसांतही दुरुस्त केली नाही 24 लाखांची कार; मालकाने खेचर जुंपून नोंदवला निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - वॉरंटी असूनही २४ लाखांच्या कारच्या सस्पेन्शनमध्ये आलेली समस्या कंपनीने १५ दिवसांतही दुरुस्त केली नाही. त्यामुळे कार मालक व्यावसायिक अर्चित अरोरा यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी आपल्या कारला खेचर जुंपून पंजाबच्या लुधियानातील सराभानगरच्या मुख्य बाजारात फिरवली. त्यांनी सांगितले की, १९ मार्च २०१५ रोजी कार खरेदी केली होती. तेव्हापासून कारमध्ये बॅटरी, दारातून आवाज येत होता,  संगीत यंत्रणा नादुरुस्त होती. सस्पेन्शनची तक्रार १५ दिवसांपासून सोडवलीच जात नव्हती.  
 
- कार सध्या वॉरंटीत आहे, पण मालक अर्चित यांनी कारचे काही सुटे भाग स्थानिक कंपनीचे टाकले आहेत. त्यामुळे काही समस्या निर्माण झाली आहे. कार दुरुस्त करण्यासाठी कंपनीला मंजुरी पाठवली होती, पण ती नाकारण्यात आली.  
- डी. एस. मान, व्यवस्थापक, कृष्णा ऑटो  
बातम्या आणखी आहेत...