आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे राज बब्बर, रालोदचे जयंत आणि सपाच्या आझम खान यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातचे दोन गुन्हेगार देशाला फसवत आहेत : राज बब्बर
अमेठी- २०१४ मध्ये गुजरातमधून आलेल्या दोन गुन्हेगारांनी संपूर्ण देशाला फसवले आहे. एकावर तडीपारीचा गुन्हा आहे, तर दुसऱ्यावर आरोप होत आहेत. ही मंडळी उत्तर प्रदेशात दोन भ्रष्टाचाऱ्यांची आघाडी झाल्याचा अारोप करत आहेत. यांनी आमचे तोंड उघडण्यास भाग पाडू नये, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली. राहुल गांधींच्या मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
 
गांधी परिवाराकडे निर्देश करण्यापूर्वी त्यांनी चार वेळा विचार करावा, असे सांगून ते म्हणाले, १९८९ पासून या कुटुंबातील कोणाही व्यक्तीने पंतप्रधानपद नाही की मंत्रिमंडळात मंत्री बनून सत्ता हाती घेतलेली नाही. या सभेत बोलताना काँग्रेसचे खासदार प्रमेाद तिवारी म्हणाले, ‘मोदींनी नोटबंदी केली, आता मतदारांनी व्होटबंदी करावी. त्यांना एकही मत देण्यात येऊ नये. भाजपवाल्यांना तसे सांगा.’
 
‘कट्टेवाल्यांचे शासन’ अशी उपरोधिक टीका  पीएमना शोभत नाही : आझम खान
अलाहाबाद | लहानसहान बाबींवर बाेलणे पंतप्रधानांना शोभत नाही. कट्टेवाल्यांचे सरकार असे कोणी सामान्य माणसाने म्हटले तर योग्य, पण पंतप्रधानांच्या तोंडी अशी वक्तव्ये शोभत नाहीत, अशी टीका समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केली.
 
नोटबंदीच्या काळात काही मातांनी मुलींच्या लग्नासाठी पैसे न मिळाल्याने आत्महत्या केली. जनतेला खोटे ठरवणारा हा देशाचा पंतप्रधान असा नसतो. पंतप्रधानांनी बेरोजगारांचीही फसवणूक केली, असा अारोप त्यांनी करत मोदींवर टीकास्त्र सोडले. बसपने १०० मुस्लिमांना उमेदवारी दिली, मग ४०३ जागावर त्यांना तिकिटे द्यायला हवी होती. त्या मुसलमानांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आझम खान यांनी केला.  
 
मोदी म्हणजे चोर : जयंत चौधरी यांची टीका  
संत कबीरनगर | मोदी चोर असल्याची टीका एका प्रचारसभेत बोलताना राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय महासचिव आणि अजितसिंगांचे चिरंजीव जयंत चौधरी यांनी केली. जयंत चौधरी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचे मोदी सांगतात. ते खोटे बोलत असून खोटारडे हे  कसलेले चाेर असतात, असे ते म्हणाले.
 
 एखाद्याची चाेरी पकडली गेली तर त्याला  खाली मान घालावी लागते. पण  मोदी इतके बेडर आहेत की वारंवार ते खोटे बोलतात. उत्तर प्रदेशात होणाऱ्या दंगलीबाबत बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशात कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे म्हटले. या दंगलीत सर्वसामान्य वगरीब माणूस होरपळला जात आहे.  संगीत सोम, संजीव बलियान आणि कादिर  राणासारखी गंभीर गुन्हे असलेली मंडळी खुलेआम फिरत आहेत, असे ते म्हणाले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...