आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकला रोखण्याचा प्रयत्न केला, धडकेत कॉन्स्टेबलचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. कोटपुटली भागात अवजड वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉन्स्टेबलला ट्रक चालकाने धडक दिली. त्यात लायक राम (३८) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेत अन्य एक जण जखमी झाले आहे. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.