आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत असेल तर तुरुंगात टाकाच, स्मृती इराणी यांचे राहुल, सोनिया गांधींना आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी अमेठीत काँग्रेसला खुले आव्हान दिले. ‘काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अथवा अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला तुरुंगात पाठवूनच दाखवावे. या पोकळ गप्पा नाहीत, मला कामाची सवय आहे. विकासाच्या मुद्द्यावर कोणी आव्हान दिले तर त्याचे स्वागतच आहे, पण मी कोणत्याही गिधाडाच्या धमकीला भीक घालत नाही. आता अमेठीत गप्पा मारून काम भागणार नाही,’ असा इशाराच स्मृतींनी दिला.

त्या म्हणाल्या, शनिवारी दिल्लीत मला नोटीस मिळाली. ‘काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांच्या विरोधात बोललात तर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाईल,’ असा इशारा त्यात आहे. अमेठीच्या जनतेला गेल्या अनेक वर्षांपासूनचा हिशेब मागण्याची इच्छा आहे. मीही त्यांच्यासोबत आहे आणि पै न पैचा हिशेब मागेन. त्यासाठी मला कोणीही कितीही नोटिसा पाठवल्या तरी त्याची पर्वा नाही. माझ्या अमेठी दौऱ्यामुळे काही लोक विचलित होतात. पण त्यांनी त्यांचे काम करावे.

स्मृतींविरोधात निदर्शने
रायबरेली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींच्या विरोधात निदर्शनेही केली. ‘स्मृती अमेठीत येऊन राहुल आणि सोनियांबद्दल अपशब्द वापरतात. आम्ही ते खपवून घेणार नाही,’ असा इशाराच त्यांनी दिला.