आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावी दिल्ली - पद्मावती चित्रपटाबाबतचा वाद आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोतचला आहे. एका वकिलांनी याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे की, ज्या वादग्रस्ती सीनमुळे वाद निर्माण होत आहे, ते चित्रपटातून वगळण्यात यावे. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार सुप्रीम कोर्टही या प्रकरणी सुनावणीसाठी तयार झाले आहे.
पद्मावती प्रकरणी दिल्ली हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. त्यात चित्रपटात राणी पद्मावतीच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच एका कमिटीच्या माध्यमातून आक्षेपार्ह सीन चित्रपटातून वगळण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलकांनी रोखला पर्यटकांचा चित्तोडगडातील प्रवेश
दरम्यान, जयपूरमध्ये पद्मावती चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्तोडगड किल्ल्यावर प्रवेश बंद केला. या किल्ल्यात पद्मिनी पॅलेस आहे. याठिकाणी पर्यटकांना प्रवेश न देण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलकांनी आम्हाला प्रवाशांना रोखण्याबाबत माहिती दिली असून याबाबत योग्य ती पावले उचलली जात आहेत.
का होतोय विरोध...
- चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजीचे महात्म्य दाखवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्याची चुकीची कृत्येदेखिल अतिशयोक्ती करत दाखवली आहेत.
- तसेच राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात ड्रीम सिक्वेन्सही शूट करण्यात आला आहे. त्याशिवाय घूमर डान्समुळेही विरोध होत आहे.
- चित्रपटात राजपूत समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचे कारण म्हणजे घूमर नृत्य पुरुषांसमोर केले जात नाही.
असा सुरू झाला होता वाद..
- राजपूत करनी सेनाने याचा विरोध केला होता. त्याची सुरुवात राजस्थानमध्ये शुटिंगच्यावेळी झाली होती. या चित्रपटात पद्मापती आणि खिलजी यांच्यात इंटिमेट सीन दाखवल्याने त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे करनी सेनेचे मत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून विरोध होत आहे. करनी सेनेने अनेक ठिकाणी आंदोलन करून पुतळ्यांचे दहनही केले आहे.
- गुजरात बीजेपीने म्हटले की, चित्रपटात क्षत्रिय समाजाच्या भावनांना ठेस पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलीजपूर्वी हा चित्रपट राजपूत प्रतिनिधींना दाखवायला हवा. त्यामुळे रिलीजच्या वेळी तणाव टाळता येईल.
दिग्दर्शकाची भूमिका..
- 'पद्मावती'ला विरोध झाल्यानंतर डायरेक्टर संजय लीला भंसाळी म्हणाले होते की, या चित्रपटात विरोध करण्यासारखे काहीही नाही.
- नुकतीच एका कलाकाराने पद्मावतीची रांगोळी काढली होती ती रांगोळीही काही लोकांनी मोडली. त्यानंतर पद्मावतीची भूमिका करणाऱ्या दीपिका पदुकोनने ब्रॉडकास्टींग मिनिस्टर स्मृती ईराणीला टॅग करत, अशा घटनांवर कारवाई व्हावी असे म्हटले होते.
पुढील स्लाइड्सवर चित्तोडडगडावरील आंदोलनाचे PHOTOS
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.