आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुस्तक आवडले नाही तर ते फेकून द्या, बंदीची याचिका फेटाळत कोर्टाने दिला निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - कचेरीच्या कायद्यांच्या जंजाळात कलेवरही बोलले जाऊ शकते. मग ती लेखन कला असो की अभिव्यक्तीच्या अन्य माध्यमाशी संबंधित. तसेच साहित्यिकाच्या बाबतीतही घडू शकते. मद्रास हायकोर्टाचा एक निर्णय त्याचेच उदाहरण. त्यावर नजर टाकणे महत्त्वाचे आहे. मुख्य न्यायमूर्ती संजय किशन कौल तामिळ साहित्यिक पी. मुरुगन यांच्या पुस्तकावर बंदीची याचिका फेटाळताना लिहितात...

‘... एखादी गोष्ट आधी स्वीकारार्ह नसेल, नंतर ती स्वीकारली जाऊ शकते. ‘लेडी चॅटर्लीचा प्रियकर’ ही कादंबरी त्याचे उत्तम उदाहरण. पुस्तक वाचणे- न वाचण्याचा पर्याय वाचकाकडे आहे. तुम्हाला एखादे पुस्तक आवडले नाही तर ते फेकून द्या. कोणतेही पुस्तक वाचण्याची कुणावरही सक्ती नाही...’

‘... फ्रान्सचा प्रसिद्ध चित्रकार- कलाकार पाब्लो पिकासोने म्हटले होते- कला कधीही शुद्ध व सरळ असत नाही. जे शुद्ध व सरळ असते ती कला असत नाही... अनेकदा कला प्रक्षोभक किंवा उत्तेजक असू शकते. मात्र ती सर्वांसाठी नाही. ती कधीही सर्व समाजाला तिला पाहण्यासाठी बाध्य करत नाही...’ ‘विकसित होणाऱ्या समाजात आमची पचवण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे विरोधी विचाराला धमक्या व हिंसाचाराला सामोरे जावे लागते... फक्त एखाद्या समूहाला पसंत नाही म्हणून हिंसक मार्गाने विचार व्यक्त करण्याचा परवाना त्याला मिळत नाही...’

‘कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध आहे, असे आम्ही म्हणत नाही. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका नाही. काेणा धर्माची बदनामी होत नाही.. काळ प्रत्येक दुखण्याचे औषध आहे. काळच आम्हाला विसरायला, माफ करायला शिकवतो... आम्ही एवढेच म्हणतो- लेखक जे चांगल्या पद्धतीने करू शकतो, ते त्याला करू द्या. त्याला लिहू द्या.’
पुस्तक, वादंग आणि बंदीची मागणी...!
२०१५ मध्ये प्रा. पेरुमल मुरुगन यांचे ‘मधोरुबगन’ (इंग्रजीत वन पार्ट वुमन) हे पुस्तक आले. त्यात तामिळ समाजातील वर्ग-लिंग भेदावर भाष्य आहे. त्याविरुद्ध आंदोलन झाले. तिरुचेनगाेडे या मुरुगन यांच्या गावातील लोकांनीच बंदीची याचिका दाखल केली.
... एका लेखकाचा मृत्यू व त्याच्या श्वासांचे परतणे!
आपल्याच लोकांच्या विरोधामुळे मुरुगन व्यथित झाले. त्यांनी २०१५ मध्ये लेखन बंद केल्याची घोषणा केली. तेव्हा त्यांनी फेसबुकवर लिहिले होते,‘ लेखक मुरुगनचा मृत्यू झाला आहे. कोर्टाच्या निकालानंतर लिहिले, ‘मला नवा श्वास मिळाला आहे.’

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...