खगडिया - एका तरुणाने प्रेमिकेचे लैंगिक शोषण करून तिला जीवंत जाळल्याची घटना बिहारमध्ये घडली. सदर पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर तिचा मृत्यू झाला.
आरोपी कुटुंबासह फरार झाला आहे. ही तरूणी मुळची तेमथा गावची आहे. तिचे भवानी शंकर कुमार या तरुणाशी प्रेम जुळले होते. शनिवारी तरुणाने तिला विवाहाचे आश्वासन दिले. तिला काही कागपत्रांसह आपल्या घरी बोलावले त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिने विरोध केला. त्यानंतर तरुणाच्या आईसह इतर नातेवाईकांनी पीडितेला दोषी ठरवले. रविवारी पहाटे तरुण भवानी कुमार प्रेमिकेच्या घरी पोहोचला. प्रेमिकेला घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या अंगावर केरोसिन टाकले आणि पेटवून दिले.