आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दार्जिलिंग बंद सुरूच; तमांग यांच्यासह दोघांची हकालपट्टी, बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)- गोरखा जनमुक्ती मोर्चाचे (जीजेएम) अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी पक्षाच्या संयोजकपदावरून विनय तमांग यांची हकालपट्टी केली असून १२ सप्टेंबरपर्यंत बंद स्थगित ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे दार्जिलिंग हिल्समधील बेमुदत बंद सुरूच आहे.  

बेमुदत बंद सुरू ठेवण्यास पाठिंबा देण्यासाठी दार्जिलिंग हिल्सच्या विविध भागांत निदर्शने सुरू आहेत. दार्जिलिंग, कुर्सिआंग, मिरिक, सोनादा आणि कालिमपाँग येथे बंदच्या समर्थनार्थ फेऱ्या काढण्यात आल्या. जीजेएममध्ये निर्माण झालेल्या मतभेदावरून हिल्समधील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला असता जीजेएमच्या समर्थकांनी त्यांना दुकाने बळजबरीने बंद करायला लावली. बंद स्थगित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात एक महिला ठार झाली, असा दावा जीजेएमच्या नेतृत्वाने केला, पण पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला.  तमांग आणि पक्षाचे आणखी एक सदस्य अनित थापा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. दरम्यान, गोरखालँड समर्थकांनी तमांग यांच्या घराची तोडफोड केली आहे. त्यांच्या घरासमोर ‘गोरखालँडचा धोकेबाज’ असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आले आहेत.  

स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गेल्या १५ जूनपासून दार्जिलिंग हिल्स भागात बेमुदत बंद सुरू आहे. शुक्रवारी बंदचा ७९ वा दिवस होता. 
बातम्या आणखी आहेत...