आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक कलहाला कंटाळूनच जिल्हाधिकाऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे स्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- कौटुंबिक कलहाला कंटाळूनच जिल्हाधिकारी मुकेश पांडे (३०) यांनी मृत्यूला कवटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीच्या हॉटेल लीला पॅलेसमध्ये मुकेश यांच्या बॅगेतून मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. या पैलूवर दिल्ली पोलिसांसोबत गाझियाबाद पोलिस, रेल्वे पोलिसही तपास करत आहे. दरम्यान, शुक्रवारी गाझियाबादमध्ये दोन डॉक्टरांनी मुकेश यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. त्याची व्हिडिआेग्राफी करण्यात आली. आता शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गुवाहाटीला पाठवण्यात येईल. मुकेश यांचे नातेवाईक तेथेच राहतात. त्यांचे वडील बंधू मॉस्कोतील भारताचे मुत्सद्दी राकेश पांडे (आयएफएस) शनिवारी पोहोचतील. मुकेश यांचे वडील डॉ. सिद्धेश्वर पांडे यांची प्रकृती बिघडली. रात्री उशिरा त्यांचे काका दिल्लीला पार्थिव ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले.

मॉलमधील प्रयत्न फसला
हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मुकेश जनकपुरी येथील सेंट्रल मॉलच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी त्यांनी नातेवाइकांना व्हॉट्सअॅपवर सुसाइड नोट पाठवली होती. परंतु तेथील गार्डने त्यांना वरच्या मजल्यावर जाण्यास रोखले. गार्डला त्यांच्या वागण्यावर संशय आला होता. त्या घाईत मुकेश यांचा मोबाइल तेथेच राहून गेला.गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा कॉल मित्रांना मिळाला होता, असे डीसीपी राकेशकुमार यांचे म्हणणे आहे. ते काहीसे गोंधळलेल्या स्थितीत दिसून येते होते. 

सीसीटीव्ही फुटेजनुसार मुकेश ५.५५ वाजता मॉल बाहेर गेले होते. पुढे मेट्रो स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये ते दिसून आले. रात्री ९ च्या सुमारास गाझियाबाद मध्ये रेल्वे पटरीवर त्यांचा मृतदेह आढळला होता.

‘चेहऱ्यावर हास्य..
मुकेश पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनुभव एका प्रसंगावर येतो. ४ ऑगस्ट रोजी कटिहारमध्ये असताना त्यांना पोलिस अधीक्षक सिद्धार्थ मोहन जैन यांनी थोडा कडक राहत जा, असा सल्ला दिला होता. त्यावर मुकेश यांनी चेहऱ्यावर हास्य आणि डिअर म्हटल्यावर सगळी कामे होतात, असे उत्तर दिले होते. हीच त्यांची आेळख होती. ते चांगले क्रिकेटपटू होते.
बातम्या आणखी आहेत...