आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचकुला हिंसाचार : काळा पैसा झाला पांढरा; बनावट कागदपत्रांद्वारे मिळवले पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला - डेरा सच्चा सौदाचा बिझनेस ब्रँड मेसेंजर ऑफ गाॅड (एमएसजी)चा सीईओ सी. पी. अरोरा यास फतेहाबाद येथे मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी अटक केली. पंचकुलामध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी त्यानेच पैशाची व्यवस्था केली होती, असा त्याच्यावर आरोप आहे. बनावट कागदपत्रे तयार करून हा पैसा वापरात आणला गेला, असा पोलिसांनी दावा केला. कारण हा सर्व काळा पैसा होता. तो पांढरा केला गेला.   

अरोरा साध्वी बलात्कार प्रकरणातील  आरोपी राम रहीम इन्साच्या निकटवर्तीयांत आहे. १७ ऑगस्ट रोजी दंगलीचा कट आखण्याच्या बैठकीत तोही उपस्थित होता. त्याच्यावर पैसे गोळा करण्याची जबाबदारी देण्यात अाली होती. त्याला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी याच प्रकरणातील आरोपी गोपाल बन्सल व डेराच्या गुप्तचर विंगच्या हवालदारासही न्यायालयात हजर केले. दरम्यान हनीप्रीत जंगी राणा येथे महेंद्रपालसिंगकडे २४ दिवस मुक्कामास होती . सुखदीपकौरने तिला लपवण्यासाठी मदत केली होती. 

सीईओवरील आरोप
- पंचकुला येथे दंगल घडवून आणणाऱ्यात हनीप्रीतने सिरसा येथील डेरामध्ये बैठक घेतली होती. या बैठकीस एमएसजीचा सीईओ सी. पी. अरोरा हजर होता.  
- राकेशकुमार अरोरा याच्यासोबत मिळून काळा पैसा पांढरा करण्यासाठी कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी सी. पी. अराेराकडे सोपवण्यात आली होती.  
- या दोघांनी ५ कोटी रुपये इतकी रक्कम उभी केली. यासाठी हनीप्रीतने कॉल केला होता.

आदित्यचा मित्र अरोरा, हिंसाचारानंतर अनेकदा भेट   
अरोरा व आदित्य इन्सा हे मित्र होते. आदित्य पंचकुला हिंसाचारातील आरोपी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी हे दोघे गुरगाव येथे भेटले होते. हनीप्रीतला पकडण्यापूर्वी आणि नंतर या दोघांच्या अनेक बैठका झाल्या. या बैठकीनंतर दोघांनी बनावट कागदपत्रे तयार केली. अरोरा, आदित्य, पवन आणि गोभी रामच्या ठिकाणांच्या बाबतीत  चांगल्या प्रकारे जाणून आहे.
बातम्या आणखी आहेत...