आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा: एरीक सिक्वेरा यांचे पुणे येथील पोलिस कोठडीत ह्रदयविकाराने निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 गोवा - ‘गोवन रेजिडेन्शन रिझोर्ट प्रा.लिमिटेड’ या कंपनीचे मालक तथा गोमंतकीय बिल्डर एरीक सिक्वेरा यांचे पुणे येथील पोलिस कोठडीत ह्रदयविकाराने निधन झाले आहे.
 
गोव्यातील एक नामंकित बिल्डर असलेले एरीक सिक्वेरा हे पणजी- रायबंदर येथील रहिवाशी होते. एका फसवणूक प्रकरणी अलिकडेच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांना पुणे येथे पोलिस कोठडीत ठेवले होते. तेथेच  ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॅफनी तसेच मुली मेलॉडी आणि मार्टीना असून ती परदेशात स्थायिक झाली आहेत.  
 
पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. पोलिस कोठडीतच त्यांना मृत्यू झाल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्यावर नोंद झालेले फसवणूक प्रकरण नेमके कोणते याची माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.                        
 
बातम्या आणखी आहेत...