आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात कैद्यांना अस्वच्छ पांघरूण: हजारोंना त्वचाविकार, छत्तीसगडमधील गलथान कारभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - एकीकडे भारतीय प्रशासन स्मार्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. देशभरात स्वच्छता मोहीमदेखील तेजीत असली तरी प्रत्यक्षात प्रशासकीय पातळीवरील मनोवृत्ती मात्र मुळीच बदलताना दिसत नाही. त्याचा प्रत्यय छत्तीसगडमध्ये येतो. राज्यात गेल्या पाच वर्षांपासून कैद्यांना अत्यंत अस्वच्छ अशा अंथरुण-पांघरुणांचा पुरवठा केला जातो. त्या चादरी कधीही धुतल्या जात नाहीत. परिणामी सुमारे २२ हजार कैद्यांना त्वचाविकाराला तोंड देण्याची वेळ आली आहे. अक्षम्य दुर्लक्षानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता चादरी धुण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे.  

कैद्यांना मानवी वागणूक दिली जात नसल्याचेच हे उदाहरण आहे. कारण पाच वर्षे वापरलेल्या चादरी, अंथरुण क्वचित उन्हात वाळवून ठेवले जात. मात्र ते पाण्याने धुतले जात नव्हते. त्यामुळे त्यात जिवाणू वाढले. कैद्यांना संसर्ग झाला, हे स्पष्ट झाले आहे. त्यासंबंधीच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाला चादरी, अंथरुण धुण्याची बुद्धी झाली. आता सुमारे ५० हजारावर चादरी धुतल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  
 
 
आरोग्य तपासणीनंतर  फुटले कारभाराचे बिंग  
छत्तीसगडमधील तुरुंगाच्या कारभाराचे बिंग एका आरोग्य तपासणीनंतर खऱ्या अर्थाने जगासमोर आले आहे. अलीकडेच राज्यातील विविध तुरुंगांतील २२ हजार कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यात बहुतांश कैद्यांना त्वचा विकार असल्याचे स्पष्ट झाले. घाणेरड्या चादरींमुळे हे आजार वाढल्याचा दावा डॉक्टरांनी केला. तेव्हा प्रशासनाचे डोळे उघडले.  
 
राज्यात ५ मध्यवर्ती तुुरुंग, १२ छोटे तुरुंग 
छत्तीसगडमध्ये ५ मध्यवर्ती तुरुंग आहेत. त्यापैकी १२ जिल्हा तर १६ छोटी तुरुंग आहेत. त्यात १८ हजारावर कैदी आहेत. त्यापैकी १० हजार कच्चे तर ८ हजार दोषी शिक्षा भोगत आहेत. प्रत्येक कैद्याला २-३ चादरी दिल्या जातात. त्यानुसार ५४ हजारांवर चादरींचा वापर केला जातो. आश्चर्य म्हणजे पाच वर्षांत एकही चादर कधी धुतली किंवा स्वच्छ करण्याचाही प्रयत्न केला गेला नाही. क्वचित त्या चादरी उन्हात वाळवल्या मात्र जात होत्या, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.  
 
वॉशिंग मशीनची परवानगी  
छत्तीसगडमधील समस्या मोठी आहे. त्यावर तातडीने ताेडगा काढण्यासाठी तुरुंग महासंचालक गिरधारी नायक यांनी वॉशिंग मशीन खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. कारण हजारो चादरी एकाच वेळी धुण्याची प्रक्रिया सोपी नसल्यामुळे प्रशासनाला यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा लागला.  
 
 
बातम्या आणखी आहेत...