आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीदाच्या मुलीच्या भवितव्यासाठी सरसावले कुलूचे जिल्हाधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरणतारण (पंजाब) - शहीद परमजितसिंग यांच्या मुलीला भेटण्यासाठी हिमाचल प्रदेशातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुलू येथील जिल्हाधिकारी युनूस खान आणि त्यांच्या पोलिस अधीक्षक असलेल्या पत्नी सोलन अंजुम आरा  यांनी पंजाबमधील तरणतारण गावास भेट दिली. या वेळी झालेल्या भेटीत त्यांनी परमजितच्या कुटुंबीयांचे सांत्वन तर केलेच; पण त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, अशा शब्दांत त्यांना धीर दिला. शहिदाची लहान मुलगी खुशदीप कौर (१२) हिचा सांभाळ करण्याची व पुढच्या भवितव्याची सर्व जबाबदारी उचलण्याची तयारी त्यांनी दाखवली.  

कुलूचे जिल्हाधिकारी युनूस खान म्हणाले : परमजितसिंग आणि प्रेम सागर यांच्या शहीद होण्याची वार्ता दु:खद होती. पण तुमच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. आम्ही “मुलगी वाचवा, मुलीला  शिकवा’ या योजनेनुसार परमजितसिंग यांची मुलगी खुशदीप कौरला सांभाळण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. मुलगी तुमच्या कुटुंबाकडेच राहील; पण तिचा खर्च करण्याची आमची तयारी आहे. तसेच वेळोवेळी वईपुंई येथे येऊन तुमची विचारपूस करू. जिल्हाधिकारी खान म्हणाले, तिला भविष्यात इंजिनिअर, डॉक्टर वा अन्य कोणत्याही क्षेत्रात जायचे असेल तर आम्ही मदत करू. तिला योग्य सल्ला देऊ. परमजितसिंग यांनी देशासाठी बलिदान केल्यामुळे खुशदीप कौरला दत्तक घेण्यासाठी संपूर्ण देशातून हात पुढे आले आहेत. तिचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.   
 
थँक यू यूनुस अंकल 
 खुशदीप कौर हिच्याशी बोलल्यानंतर ती म्हणाली : थँक यू यूनूस अंकल! अाता मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकेन, असा विश्वास वाटतो. मी मन लावून अभ्यास करणार आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...