आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड निवडणुकीच्या तारखा सुरक्षेच्या आढाव्यानंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर व उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख पुढील वर्षी जाहीर केली जाणार आहे. सुरक्षा दलाच्या अहवालावर हा कार्यक्रम अवलंबून असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी स्पष्ट केले आहे.
पुढील वर्षी सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे होऊ शकते. तेव्हाचे वातावरण, परीक्षांचे वेळापत्रक इत्यादी मुद्द्यांवर माहिती मागवण्यात येत आहे. त्यावर विचारविनिमय केला जाणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे टप्पे ठरवता येणार आहेत. तूर्त तरी त्यावर विचार देखील करता येणार नाही, असे झैदी यांनी सांगितले. उत्तर प्रदेश विधानसभा पुढील वर्षी मेमध्ये विसर्जित होणार आहे. त्याचबरोबर पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड यांचा कालावधी मार्च २०१७ मध्ये संपणार आहे.

आदर्श आचारसंहिता राबवू
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे झैदी यांनी सांगितले. निवडणूक होऊ घातलेल्या राज्यात राम मंदिरासंबंधी वक्तव्ये करून मतदारांना आकर्षित करणाऱ्यांस रोखणार का, या प्रश्नावर झैदी यांनी आचारसंहितेला राबवू, असे सांगितले.

पैशांच्या गैरवापरावर लक्ष
गेल्या काही निवडणुकीत पैशांचा गैरवापर झाल्याचे आढळून आले होते. त्यावर आम्ही कारवाई केली होती. आगामी निवडणुकीतही हा विषय चिंतेचा आहे, परंतु आम्ही त्यासाठी एक व्यूहरचना तयार केली आहे. गैरवापराबद्दलची माहिती गोळा करून त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आयोगाने सरकारला पत्र लिहून अशा प्रकारच्या कृतीला लाचखोरीच्या गुन्ह्यांतर्गत समाविष्ट करण्यात यावे, असे कळवले आहे, अशी माहिती झैदी यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...