आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम घोटाळ्यामुळे हार, मतपत्रिकेवर मतदान घ्या, मायावती, निकालानंतर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लखनऊ - निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर बसप प्रमुख मायावती यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, ‘कोणतेही बटण दाबा, मतदान भाजपलाच जाईल, अशी उत्तर प्रदेशात उघड चर्चा होती. मुस्लिमबहुल भागातील बहुतांश मते भाजपला मिळाली आहेत. त्यामुळे ईव्हीएम घोटाळ्याच्या शंकेला पुष्टीच मिळते. उत्तर प्रदेशात १८ ते २० टक्के मुस्लिम मतदार आहेत. भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. तरीही भाजप जिंकला, ही बाब न पटण्यासारखी आहे.’

 मायावतींनी याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. विद्यमान निवडणूक रद्द करून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी त्यात केली आहे. याबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ मायावतींची स्थिती समजू शकतो. मी काहीही टिप्पणी करणार नाही.
 
पुढील स्लाईडवर वाचा, मायावती यांची अवस्था समजू शकतो, त्यावर मी काय बोलू?, -अमित शहा, मायावतींच्या विधानावर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...