आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेकी मोहंमद सैफुल्लाच्या पित्याचा सरकारला अभिमान : गृहमंत्री राजनाथसिंह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात बुधवारी चकमकीत मारला गेलेला इसिसचा संशयित अतिरेकी मोहंमद सैफुल्लाह याच्या पित्याने देशद्रोही मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. देशावर निष्ठा असलेल्या या पित्याचा सरकारला अभिमान आहे, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत सैफुल्लाहचे पिता मोहंमद सरताज यांचा सन्मान केला.
 
दरम्यान, राजनाथ यांनी मोहंमद सरताज यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केल्यानंतर लोकसभेत सदस्यांनीही बाके वाजतून त्यांना अनुमोदन दिले. लखनऊमध्ये एका इमारतीत लपून बसलेल्या सैफुल्लाह याला एटीएसने चकमकीत ठार केले होते.
 
एनआयएकडे चौकशी
दरम्यान, लखनऊमधील चकमक व एटीएसने पकडलेल्या ६ संशयितांच्या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनआयए) चौकशी करणार असल्याची घोषणा राजनाथसिंह यांनी केली. एटीएस पथकांनी मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून सहा जणांना पकडले आहे. त्यांची चौकशीही एनआयए करेल.

काय सांगितले वडिलांनी..
- सैफुल्लाहच्या वडिलांनी सांगितले की, तो बी. कॉम पर्यंत शिकलेला होता. त्याला खूप मोठे व्हायचे होते, त्या,ठी तो सौदीला जाणार होता. 
- सरताज म्हणाले की, सकाळी तो दहा वाजता घरातून जायचा आणि रात्री उशीरा घरी परतायचा. काही विचारले तर वाद करायला लागायचा. एवढंच म्हणायचा की, एवढा पैसा कमवेन की सगळे पाहत राहतील.
- तीन महिन्यांपूर्वी मी त्यारा मारले त्यानंतर तो घर सोडून निघून गेला. जाताना त्याचा पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड आणि इतर सर्व सर्टिफिकेटट घेऊन गेला होता. 
- वर्षभरापूर्वी त्याने एक लॅपटॉप खरेदी केला होता, पण त्याला कोणाला हातही लावू देत नव्हता. 
- तो दहशतवादी बनला असल्याचे आम्हाला टिव्हीवर बातम्या पाहिल्यानंतरच समजले. 
- सैफुल्लाच्या भावाने त्याला कोणीतरी चिथावणी दिली असावी असे म्हटले आहे. 
 
मध्य प्रदेश पोलिसांनी आधी संशयितांना अटक केली. त्यानंतर युपी एटीएसने कानपूर-इटावामधून तीन संशयितांना अटक केली. त्यानंतर लखनौमध्ये हा दहशतवादी लपलेला असल्याचे इनपुट मिळाले होते. पोलिस अजूनही फरार असलेल्या दोघांचा शोध घेत आहेत. या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि काडतूसे आढळली आहेत. तो ISIS च्या खुरासान मॉड्यूलचा मेम्बर असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
ATS ने संशयिताशी बोलण्याचा प्रयत्न केला. जीव देईल पण शरण येणार नाही, असे तो म्हणाला. त्यानंतर फायरिंगचे प्रमाण वाढले. रात्री गॅस कटरच्या माध्यमातून छत कापून एटीएसने आतल्या परिस्थितीचा अंदाज घेतला. पोलिसांनी आधी एक संशयित मारल्याचे सांगितले पण नंतर एन्काऊंटर सुरू असल्याचे सांगितले. हा ISIS चा दहशतवादी असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.  
 
दहशतवाद्याकडे आढळले पिस्तुल, चाकू 
- यूपी एटीएसच्या मते एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे वय 22 ते 23 दरम्यान होते. त्याच्याकडे चाकू, 9mm ची पिस्तुल आणि एक बॅग सापडली. 
- घरात दोन दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण आत सैफुल्लाह हा एकच दहशतवादी होता आणि तो मारला गेला. 
- युपी एटीएस आयजी म्हणाले की, दहशतवाद्याला जीवंत पकडण्याचा आमचा प्रयत्न होता, पण तो ठार झाला. 
 
मंगळवारचा घटनाक्रम..
1) भोपाळपासून 70 किमी अंतरावर कालापिपलमध्ये जबडी स्टेशनजवळ सकाळी भोपाळ -उज्जैन पॅसेंजर (59320) ट्रेनच्या जनरल कोचमध्ये ब्लास्ट झाला. त्यात 9 जण जखमी झाले.  
 
2) दुपारी 12.30 वाजता 4 संशयितांना अटक करण्यात आली. दुपारी 2.30 पर्यंत त्यांची भोपाळमध्ये चौकशी सुरू होती. याच संशयितांनी कानपूर आणि लखनौमधील संशयितांबाबत माहिती दिल्याची शक्यता आहे. 
 
3) दुपारी 2.30 वाजता कानपूरमध्ये अटक केलेल्या संशयिताने लखनऊबाबत माहिती दिली. 
 
4) 3.30 वाजता एन्काऊंटरला सुरुवात झाली. घरात एक संशयित होता त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने शरण येण्यास नकार दिला. 
 
5) रात्री 8.30 च्या सुमारास पोलिस आणि एटीएसने गॅस कटरच्या मदतीने छत कापून आतल्या स्थितीचा अंदाज घेतला, त्यावेळी संशयित दहशतवादी बेशुद्ध होता, पण त्याच्या हातात शस्त्र होते. 
 
6) 9.30 वाजता कमांडोज डॉक्टरला घेऊन आत गेले. तो मेल्याचे पोलिसांनी सांगितले. पण आत आणखी लोक असलेयाची शक्यता व्यक्त करण्यात आली. गॅस कटरने छत कापले तेव्हा आत दोन जण दिसल्याचे जवानांनी सांगितले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...