आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 तासांच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार; पोलिस शहीद, काश्मीरच्या त्रालमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील त्रालमध्ये झालेल्या तुंबळ चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले. शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून सुरू झालेल्या या १२ तासांच्या चकमकीत एक पोलिस कॉन्स्टेबलही शहीद झाला.  
 
ठार झालेल्यांत अकीब भट्ट ऊर्फ अकीब मौलवी या हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याचा समावेश आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून त्रालमध्ये सक्रिय होता. सैफ-उल्लाह ऊर्फ ओसामा असे ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. उरीचा मंजूर अहमद नियाक हा पोलिस कॉन्स्टेबल शहीद झाला. आर. रेशी हा लष्करातील मेजर गोळीबारात जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  दोन दहशतवादी एका सुताराच्या घरात दडून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी त्या घराला वेढा घातला. गोळीबारामुळे त्रालमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. लोक रस्त्यांवर येऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. लोकांनी जवानांवर दगडफेकही केली, पण जवानांनी जमावाचा पाठलाग करून परिस्थिती नियंत्रणात आणली. लोकांच्या हालचालींवर कडक निर्बंध लादण्यात आले होते. या चकमकीदरम्यान काही लोकांनी सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याची इन्सास रायफलही हिसकावली.  
 
अकीबने वडिलांचा अखेरचा निरोप घेतला  
सुरक्षा दलांनी सांगितले की, चहूबाजूंनी घेरल्या गेलेल्या अकीब भट्टने रविवारी पहाटे वडिलांना दूरध्वनी केला आणि त्यांचा अखेरचा निरोप घेतला. त्राल भागातील हैना येथे त्याचे पिढीजात घर आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...