आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वेच्छानिवृत्ती योजनेचा ईपीएफओचा विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या प्रस्तावावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) विचार करत आहे. या योजनेअंतर्गत कंपनीची इच्छा असेल तर कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्वेच्छा योगदान देऊ शकते. सध्या असलेल्या पीएफ योजनेच्या विरुद्ध प्रस्तावित योजनेत निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे ग्राह्य धरण्यात येणार आहे. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

ईपीएफओच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना तयार करण्यात आली असल्याचे जॉय यांनी सांगितले. या योजनेमध्ये कर्मचारी स्वेच्छेने आपले पैसे जमा करू शकतात. त्यांच्या या पैशाचे नियोजन ईपीएफओच्या वतीने करण्यात येईल. हा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. कामगार मंत्रालयाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात आल्यानंतर या पैशाला प्राप्तिकरात सूट देण्यात यावी यासाठी हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी एलआयसीच्या वतीने आधीच अशा प्रकारची योजना राबवण्यात येत आहे. ईपीएफओच्या वतीने सध्या अनिवार्य असलेल्या निवृत्ती वेतन याेजनेव्यतिरिक्त ही योजना असणार आहे.

आधार आवश्यक
निवृत्तिवेतनयोजनेसाठी निवृत्तिधारकांना आपल्या यूएएनला आधार क्रमांंकाशी जोडावे लागणार आहे. निवृत्तिवेतन कर्मचाऱ्याला मिळण्यासाठी सध्या ईपीएफओ २४ बँकांसोबत मिळून काम करत आहे.
बातम्या आणखी आहेत...