आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये 2000 विद्यार्थ्यांच्या सरकारी शाळेत शिकवण्यासाठी सम-विषम सूत्र लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबनी - बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील गोकुल मथुरा सुडी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेत शिक्षणासाठी सम-विषम सूत्र लागू आहे. इथे आठवड्यातून तीन दिवस मुले तर उर्वरित तीन दिवस मुली शिकतात. ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या तासिकेचे सूत्र दोन वर्षांपासून लागू आहे. जागेच्या कमतरतेमुळे हा उपाय योजण्यात आला आहे.

९५ वर्षे जुने हे विद्यालय जिल्ह्यातील मोठ्या शाळांपैकी एक आहे. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पासवान म्हणाले, इथे जवळपास २००० विद्यार्थी आहेत. सुरुवातीस तासिका शाळा परिसरात भरत. मात्र, २०१४ मध्ये भूकंपामुळे जुन्या इमारतीचे नुकसान झाले. त्यामुळे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या इमारतीत नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. मात्र, तिथे केवळ चारच खोल्या असल्याने व शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या दिवशी तासिका घेणे सुरू केले. सोमवार, मंगळवार आणि बुधवार केवळ विद्यार्थिनींना शिकवले जाते. उर्वरित तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी शाळा भरते. शिक्षण विभागाच्या आदेशावरून हे सूत्र लागू केले काय, या प्रश्नावर पासवान यांनी आमच्या स्तरावर लागू केल्याचे सांगितले. स्थानिक आमदार समीरकुमार महासेठ याच शाळेत शिकले आहेत. त्यांनी हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित केला. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षणाधिकाऱ्यांना याची माहितीही दिली. मात्र, काहीच सुधारणा झाली नाही. मधुबनीचे जिल्हाधिकारी गिरिवर दयाल सिंह यांनाही शाळेतील सम-विषम सूत्राची कल्पना 
आहे. सिंह यांनी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मधुबनीचे प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी मो. अहसन यांनीही त्यास दुजोरा दिला.
 
९५ वर्षे जुने विद्यालय
- मधुबनी जिल्ह्यात हे दुसरे सर्वात मोठे विद्यालय आहे. २०१४ च्या भूकंपात मुख्य इमारत कोसळली होती.
- येथील मुले केंद्रीय कृषिमंत्री (चतुरानन मिश्र) व बिहारच्या गृह सचिवासारख्या पदांवर कार्यरत होते. विद्यमान आमदारही याच शाळेत शिकले.
{ मधुबनी जिल्ह्यात हे दुसरे सर्वात मोठे विद्यालय आहे. २०१४ च्या भूकंपात मुख्य इमारत कोसळली होती.
{ येथील मुले केंद्रीय कृषिमंत्री (चतुरानन मिश्र) व बिहारच्या गृह सचिवासारख्या पदांवर कार्यरत होते. विद्यमान आमदारही याच शाळेत शिकले.