आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, MP मध्ये लष्कर बोलावले, 24 तासांत झाले 20 मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. - Divya Marathi
गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
देहराडून/भोपाळ - देशाच्या बहुतांश भागामुळे जोरदार पावसामुळे सध्या हाहाकार माजला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे दोन कुटुंबातील सात जण दगावले आहेत. तर मध्यप्रदेशच्या वेग वेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 20 मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डिझास्टर मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पूर आणि इतर अपघातांमध्ये देशभरात 480 जणांनी प्राण गमावले आहेत.

दोन घरे वाहून गेली, पाच मृतदेह ताब्यात
- रिपोर्ट्सनुसार पौडी जिल्ह्याच्या मरखोला गावात ढगफुटीमुळे दोन घरे वाहून गेली.
- तर घरे कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून लोकांनी प्राण गमावले आहेक. घटनास्थळाहून पाच मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दोन मृतदेह अझूनही सापडलेली नाहीत. तीन जण जखमीही झाले आहेत.

#1. एमपीच्या रिवा आणि सतनामध्ये सर्वाधिक नुकसान
- एमपीच्या विंध्य आणि बुंदेलखंड परिसरात पावसाने सर्वाधिक धुमाकूळ घातला आहे. मेहरमध्ये अनेक घरे जमिनदोस्त झाली आहेत. याठिकाणी 12 हून अधिक जण ठार झाले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रिवा जिल्हा बेटासारखा भासत आहे. अनेक भागांत पाणी आहे. त्यामुळे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
- लष्कराचे 60 जवान आणि दोन हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत. छतरपूर, पन्ना, दमोह, इटारसी, बैतूल, हौशंगाबाद, रायसेन आणि टीकमगढ जिल्ह्यात पावसाने लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
- विंध्यमध्ये रिवा-सतना रोडवर उन्नत बीहर पूल बुडाला आहे. बीहर नदी धोक्याच्या पातळीपेक्षा दोन मीटर वरून वाहत आहे.

#2. बिहार : गंगा नदीने मोडला 22 वर्षांचा विक्रम
- पटनामध्ये 22 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1975 नंतर प्रथमच पटना शहरातील रहिवासी भागात पाणी घुसले आहे. धोक्याचा अंदाज असल्याने लष्कर सतर्क आहे. छपरा, खगडिया आणि सासाराममध्येही पाणी लोकांच्या घरांपर्यंत पोहोचले आहे.
- दरम्यान सारणमध्ये 50 हजाराहून अधिक घरे पाण्यात बुडाली आहेत. तर रोहतास जिल्ह्यातही शंबऱाहून अधिक गावे पाण्याने वेढलेली आहेत. सुमारे दीड लाखाच्या लोकसंख्येमुळे पुराचा धोका वाढला आहे.

#3. राजस्थान : बारा-झालावाडमध्ये पूर, 12 ठार
- झालावाड आणि बारामध्ये पूर येण्याची शक्यता आहे. चित्तोडगडमध्येही स्थिती गंभीर आहे. अनेक भागांत लष्कर पाचारण केले आहे. झालावाडच्या वेग वेगळ्या गावांत 12 जणांनी प्राण गमावले आहेत.

#4. युपीमध्ये गंगेने ओळांडली धोक्याची पातळी
- युपीमध्ये गंगा नदीसह अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. चित्रकूटमध्येही मंदाकिनीची पातळी वाढल्याने चिंता वाढली आहे.
- वाराणसीत गंगा तर अलाहाबादेत यमुना धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पुराचे काही PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...