आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीही न मिळालेल्या वेतनाचा कर परतावा कसा : शरीफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - एखाद्या व्यक्तीने कधीही वेतन घेतलेले नसल्यास तो त्या बदल्यात कर परतावा कसा दाखल करू शकेल, असा प्रश्न पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी उपस्थित केला आहे. दुबईत त्यांच्या मुलाची कंपनी आहे. त्या कंपनीत नोकरीला असूनदेखील ही बाब लपवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पनामा प्रकरणात त्यांना अपात्र जाहीर केले होते. 
 
शरीफ यांना गेल्या आठवड्यात न्यायालयाने अपात्र घोषित केले होते. एका अनौपचारिक गप्पांत शरीफ यांनी हा प्रश्न उपस्थित केला. कधीही छदामही घेतला नसल्याने आयटी रिटर्न कसा भरायचा, असे त्यांनी विचारल्याचे जिआे न्यूजने म्हटले आहे. मला आलेला अनुभव हा जगासमोर आहे. माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचा एक तरी पुरावा मांडण्यात आला का? सार्वजनिक पैशांचा गैरवापर केल्याचाही पुरावा आहे का? कारण देशाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे वाईट गोष्टी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काही भाष्य करायचे नाही. मी राजकीय विजनवासात नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सत्ताधारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात फेरआढावा याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ पोटनिवडणूक लढवून पंतप्रधानपद मिळवण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु नूतन पंतप्रधान अब्बासी यांना पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत सत्तेवर राहावे लागू शकते, असे सांगितले जाते. शरीफ यांची कारकिर्द अपूर्ण राहण्याची ही तिसरी वेळ आहे.  
 
‘मुशर्रफ कोणत्या जगात राहतात मला ठाऊक नाही’  
पाकिस्तानमध्ये लष्करशाही असतानाच चांगले दिवस होते, असे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यावर शरीफ यांनी तिरकस टिप्पणी केली. ते कोणत्या जगात राहतात मला ठाऊक नाही. लोकांमध्ये येऊन अशी विधाने करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असे शरीफ म्हणाले.  
बातम्या आणखी आहेत...