आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरला मारणाऱ्या माजी मंत्र्याला माफी; राज्य सरकारचा प्रस्ताव वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्याचे माजी मंत्री फ्रान्सिस्को मिकी पचेको यांना माफ करण्याच्या राज्य सरकारचा प्रस्ताव वादात अडकला आहे. इंजिनिअरला थापड मारल्याप्रकरणी पचेकोंना सहा महिन्यांची शिक्षा झालेली असताना गोवा कॅबिनेटने त्यांच्या माफीचा प्रस्ताव राज्यपालाकंडे पाठवला आहे. या प्रस्तावाचे समर्थन करताना गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी चापट मारणे किरकोळ गुन्हा असल्याचे विधान केले आहे. काँग्रेस व आपने मात्र माफी प्रस्ताव फेटाळण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.

२००६ च्या या घटनेसाठी न्यायालयाने त्यांना सहा महिन्याची शिक्षा ठोठावली हाेती. त्यामुळे एक जूनपासून ते तुरुंगात आहेत. उपमुख्यमंत्री डिसुझा यांनी वृद्ध आई व आजाराची देखभाल करण्यासाठी त्यांना शिक्षेतून सूट दिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांना सुधारणेची संधी दिली पाहिजे. त्यासाठी शिक्षेची तरतूद असता कामा नये.
बातम्या आणखी आहेत...