आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी अडवून चार महिलांवर सामूहिक बलात्कार; 40 हजार रुपये, मोबाइल व दागिनेही लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लखनऊ - जेवर येथील एका कुटुंबाचे ग्रेटर नोएडाजवळील जलदगती महामार्गावर वाहन अडवून सुमारे ४० हजार रुपये, मोबाइल व दागिन्यांची लूट करून चार महिलांवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणाची उत्तर प्रदेश पोलिसांनी शेजारच्या राज्यातील पोलिसांसह विविध ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली आहे.  

उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन करून या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. शेजारच्या राज्याकडून माहितीही गोळा करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीचा निश्चित छडा लावण्यात येईल, असे मेरठचे सहायक पोलिस महसंचालक आनंदकुमार यांनी सांगितले. सशस्त्र दरोडेखोरांनी २५ मे रोजी यमुना जलदगती मार्गावरून बुलंद शहराकडे जाणाऱ्या एका वाहनास अडवून एका व्यक्तीस गोळी घातली. 
 
त्यानंतर त्यांनी लोकांकडील दागिने व रोख रक्कम काढून घेतली. चार महिला या कारमधून प्रवास करत होत्या. त्यांच्यावर या दरोडेखोरांनी बंदुका रोखून सामूहिक बलात्कार केला. २६ मे रोजी या दरोडा प्रकरणात चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संशयिताबद्दल पक्की खात्री होताच त्यांना अटक करण्यात येईल. आणखी काही संशयितांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जेवरचे पोलिस उपअधीक्षक दिलीप सिंग यांनी पत्रकारांना दिली.
बातम्या आणखी आहेत...