आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्कुटवर मैत्री, 6 महिन्यांपासून लिव्ह-इनमध्ये, निर्घृण खून करुन घरातच बांधले थडगे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका हायप्रोफाइल मर्डर प्रकरणाचा पर्दाफाश झाला. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या उदयन नावाच्या उच्चशिक्षित तरुणाने आयआयटीएन प्रेयसी श्वेताचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका लोखंडी पेटीमध्ये बंद करून वर सिमेंटचे थडगे बांधले. तो बॉक्स घरातील पहिल्या मजल्यावर ठेवला होता. ही घटना जुलै २०१६ मधील आहे. पण याची माहिती कोणालाच नव्हती. या प्रेमीयुगुलाचे लग्न झालेले होते, परंतु पालकांना याची माहिती दिली नाही.
 
तरुणीने मात्र आई-वडिलांना आपण न्यूयॉर्कमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले होते. ती पालकांशी सतत खोटे सांगून दिशाभूल करत होती. हत्येनंतर तरुणीच्या पालकांशी बोलणे बंद झाले तेव्हा त्यांना संशय आला. मोबाइलचे लोकेशन शोधण्यात आले तेव्हा ते भोपाळमध्ये असल्याचे समजले. त्यांनी डिसेंबर २०१६ मध्ये पश्चिम बंगाल पोलिसांत त्यांनी हरवल्याची तक्रार दिली. गुरुवारी पश्चिम बंगाल पाेलिस भोपाळमध्ये दाखल झाले. त्यांनी उदयनची चौकशी सुरू केली. ते त्याच्या घरी गेले. रात्री उशिरापर्यंत श्वेताचा मृतदेह ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली होती. 
 
स्वत: आयआयटी पास असल्याचा उदयनचा दावा, त्याच्याकडे होत्या मर्सिडीझ आणि ऑडी कार  : उदयनचा या भागात खूप दबदबा होता. तो ऑडी आणि मर्सिडीझसारख्या आलिशान गाड्यांतून फिरायचा. काही दिवसांपूर्वी तर तो आपणास गुप्तचर विभागात नोकरी मिळाल्याचे सांगत होता. तो स्वत:ला दिल्लीत २०१४ मध्ये आयआयटी उत्तीर्ण झाल्याचे सांगतो. काही दिवसांपूर्वी त्याने श्वेताच्या खात्यातून ६० हजार रुपये काढल्याचे तपासात निष्पन्न झाले.

- २००७ मध्ये ऑर्कुटवर दोघांमध्ये मैत्री झाली. जूनपासून ती उदयनसोबत  
- जून २०१६ मध्ये घरातून नोकरीसाठी बाहेर पडली. जुलैपर्यंत केवळ मेसेजद्वारे संपर्कात असायची.  
- अमेरिकेत नोकरीस असल्याचे पालकांना सांगितले

उदयनने श्वेताची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका पेटीत ठेवला. त्यात तीन पोती सिमेंट टाकून त्यावर पाणी टाकले. मृतदेह दगडात लपवण्यासारखा व्हावा असा उद्देश. कोणाला संशय येऊ नये म्हणून सिमेंटचे थडगेही बांधले.  
 
पुढील स्लाइडवर पाहा घटनेशी संबंधीत फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...