आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याच्या किनारपट्टीवर झिंगणाऱ्यांना आता तुरुंगाची हवा, सध्या किनारे सर्रास धुंद...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्याचे किनारे सर्वांना आकर्षित करतात. त्यातही मद्यपींसाठी खुलेआम असणाऱ्या किनाऱ्यांवर लवकरच पोलिसांची करडी नजर राहणार आहे. झिंगणाऱ्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.  
 
जगप्रसिद्ध किनाऱ्यांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी कोणतीही बेकायदा कृती खपवून घेतली जाणार नाही. त्यात मद्यपानाला रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मद्यपींना समज देऊन कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. आम्हाला त्यांना अटक करायची नाही. परंतु किनारे अस्वच्छ करणाऱ्यांना गरज भासल्यास तत्काळ अटक करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. त्यासाठी पर्यटनविषयक कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. कोणीही कायदा हाती घेऊ शकत नाही, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. राज्यात गेल्या पाच वर्षांत ३ हजारांवर लोकांचे प्राण वाचवण्यात लाइफगार्ड््सना यश आले आहे. सध्या ६७७ लाइफगार्ड््स किनारपट्टीवर सदैव मदतीसाठी तयार असतात, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.  
 
मेपासून इशारा  
यंदाच्या मे महिन्यापासून पोलिसांनी पर्यटकांना सार्वजनिक ठिकाणी किंवा किनारपट्ट्यांवर मद्यपान केल्यास तत्काळ अटक केली जाईल, असे बजावले होते. त्यामुळे ही संख्या आता कमी असली तरी कायद्याचा अपेक्षित धाक मात्र दिसून येत नाही. त्यामुळे गोव्यातील भाजप सरकारने मद्यपींवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात दुरुस्तीची योजना आखली आहे. त्याला लवकरच हिरवा कंदील मिळणे अपेक्षित आहे.  
 
सध्या किनारे सर्रास धुंद..  
गोव्यात सध्या किनारे आणि बऱ्याच सार्वजनिक ठिकाणांवर खुलेआम मद्यपान केले जाते. त्याबद्दलच्या अनेक तक्रारीही सरकारकडे आल्या आहेत. परंतु त्यावर अद्याप ठोस कारवाईची व्यवस्था कायद्यात नाही. त्यामुळे किनारे फुल्ल टू धुंद िदसून येतात, ही बाब सरकारने सभागृहात मान्य केली.  
बातम्या आणखी आहेत...