ननू जोगिंदर सिंह - उत्साह, उल्हास आणि भक्ती. देवी कामाख्या शक्तिपीठाच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदोत्सव सुरू होता. एकीकडे मंत्रोच्चाराच्या आवाजात हवन सुरू होते, दुसरीकडे मनसा देवी मंदिरात लग्नाचे विधी सुरू होते. दुसरीकडे विशेष कीर्तन करणारी नागर मंडळी आनंदोत्सवाच्या प्रसंगी वाजवले जाणारे संगीत वाजवत होते. कश्यप गोत्राचे कायस्थ हिरेन जगतजननीच्या विवाहाचे विधी करण्यासाठी निघाले होते.
माता कामेश्वरी आणि कामेश्वर महाराजांच्या विवाहाचे तीन दिवस असे उत्साहाचे असतात. माता कामेश्वरी म्हणजे सती आणि भगवान कामेश्वर म्हणजेच भगवान महादेव यांचा विवाह आसामी रीतिरिवाजांप्रमाणे होतो. पौष महिन्याची कृष्ण द्वितीया आणि तृतीयेला जेव्हा पुष्य नक्षत्र असते तेव्हा विवाह होतो. वरात येते, फेरे होतात आणि आजकालच्या विवाहांप्रमाणे भोजनही होते. या वेळी १२ जानेवारीला लग्नाच्या विधींना प्रारंभ झाला. संध्या आरतीनंतर कामाख्या मंदिरातून भगवान पालखीत भगवान विराजमान होते. हे विधी मंदिरात राहणारे पुजारी आणि कायस्थच करतात. भगवान कामेश्वरांच्या पालखीसोबत भक्तगण मंदिरात गेले. तेथे त्यांना गर्भगृहात स्नानानंतर पोशाख आणि दागिने घालण्यात आले. देवी कामाख्याकडून देवाला सोन्याची साखळी, नवे कपडे, मिठाया आणि भेटवस्तू दिल्या जातात. नंतर सर्वांना भगवान कामेश्वरातर्फे नाश्ता दिला जातो. तो लोक प्रसाद म्हणून ग्रहण करतात. देवीलाही हळद लावली जाते, नवे कपडे परिधान करतात. १३ जानेवारीला दुपारी १२ वाजेचा मुहूर्त भगवान कामेश्वर यांना आणण्याचा होता. आदिवासी परंपरेनुसार नवरदेवाला आणले जाते. लग्नासाठी काही लोक राजा, मंत्री आणि राक्षसाच्या वेशात येतात. सर्व नाचत-गात असतात. नंतर त्यांची पालखी कामाख्या देवीच्या मुख्य मंदिरापर्यंत गेली. मंदिरात वधूच्या पित्याची जबाबदारी पार पाडली पंडित गौतम शर्मांनी. त्यांनी आधी केळे आणि दह्याने देवाचे हात-पाय धुतले. नंतर आरती केली.
नंतर सुरू झाले मनसा देवीच्या विवाहाचे विधी. देवीला पर पक्षाकडून साड्या, दागिने आणि चांदीची भांडी देण्यात आली. मंत्रोच्चारासह विवाहपूजा झाली. मंदिराच्या बाहेरच्या भागात हवन झाले.सर्व विधी पार पडल्यानंतर माता कामेश्वरी आणि भगवान कामेश्वर यांची पालखी नात मंदिरात पोहोचली. तेथेच सप्तफेरे झाले आणि हा विवाह सोहळा पार पडला.