आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार, योगी सरकारचा 3.84 लाख कोटींचा अर्थसंकल्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - १९ मार्च रोजी स्थापन झालेल्या योगी सरकारने मंगळवारी ३.८४ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात ५५,७८१ कोटी रुपयांच्या नव्या योजना राबवण्याचा निर्णय झाला. अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले, गरिबी नष्ट करण्याचा आमचा संकल्प आहे. गरीब, बेरोजगारांसाठी  तसेच शेतकऱ्यांसाठीचा  आमचा अर्थसंकल्प असेल. राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी जाहीर केला. सरकार लवकरच टेक्स्टाइल धोरण आणेल, असेही स्पष्ट केले. या अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही वर्गांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या. शेती उत्पादनांवर कर आकारला जाणार नाही, तर बुंदेलखंड ते दिल्लीदरम्यान एक्स्प्रेस मार्गासाठी केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली. राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याचाही प्रस्ताव आहे. या वेळचा अर्थसंकल्प ११ टक्क्यांनी वाढला आहे. 
 
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये  
- मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येईल.  
-  नगरविकास योजनांसाठी ३०० कोटींची तरतूद  
- अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्कॉलरशिपसाठी ७९१.८३ लाख कोटींची तरतूद  
- १.५० लाख पोलिस कर्मचाऱ्यांची होणार भरती  
- पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत ३ हजार कोटींची तरतूद  
- साखर उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी २७३ कोटींची तरतूद  
- मेट्रो रेल परियोजनेसाठी २८८ कोटींची तरतूद  
- पूर्वांचल विशेष योजनेसाठी ३०० कोटी रुपये  
-  बंुदेलखंडातील विशेष योजनेसाठी २०० कोटी रुपये  
- जेवरमध्ये इंटरनॅशनल विमानतळ तयार होणार.
बातम्या आणखी आहेत...