आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल वाढल्यावर निर्धारित कराचे टप्पे कमी होतील, जीएसटीबाबत राज्यमंत्री मेघवाल यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत निर्धारित कराचे टप्पे कमी होण्याची शक्यता असून पुढील काळात कर संकलनात वाढ होण्यावर ते अवलंबून राहील, असा दावा अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शनिवारी केला. देशभरात लागू करण्यात आलेल्या या एकाच करप्रणालीमध्ये कराचे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये पाच, १२, १८ आणि २८ टक्के यांचा समावेश आहे. या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेअंतर्गत वेगवेगळे कराचे टप्पे ठेवणे योग्य निर्णय असल्याचेही ते म्हणाले.

जीएसटी प्रणाली केंद्र सरकारने बहुमताच्या आधारावर नाही तर सर्व राज्यांशी चर्चा केल्यानंतर सहमती घेऊन लागू केली आहे. या प्रणालीला विरोध असता तर केंद्राने ही प्रणाली लागू केली नसती, असेही त्यांनी सांगितले.  जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) पूर्णपणे योग्य असल्याचे मतही मेघवाल यांनी व्यक्त केेले आहे.  
बातम्या आणखी आहेत...