आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणूक: वाचा हार्दीक पटेल आणि उपमुख्‍यमंत्री नितीन पटेल यांची मुलाखत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- ‘पास’ अाणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला खेळ पाहता अनेक प्रश्न निर्माण हाेत अाहेत. या मुद्द्यावर नेमके काय हाेईल, हार्दिकला काँग्रेसचा फाॅर्म्युला मान्य असेल किंवा नाही या अनुषंगाने दिव्य भास्करने चर्चा केली तसेच उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचीही मुलाखत घेतली. भाजपची रणनीती अाणि हार्दिक पटेलचा प्रभाव या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. 

 

अहंकार विरुद्ध अधिकाराचा संघर्ष; भाजपचे कटकारस्थान- हार्दीक पटेल

‘पास’ अाणि काँग्रेसमध्ये अचानक काय घडले? 
- गेल्या काही दिवसांत गुजरातमध्ये जे काही घडले ते भाजपची निवडणूकविषयक चिंता दूर करून खुश करण्यासाठीचा जणू राजकीय स्टंट असल्यासारखे वाटत अाहे. मी कुणावर अाराेप करीत नाही, परंतु जाे लावला जात अाहे त्याविषयीच बाेलताे अाहे. 


काेणत्या प्रकारे? 
- हे हार्दिक अाणि अल्पेशला समाजातून वेगळे पाडण्याचे कटकारस्थान अाहे. अहंकाराच्या विराेधात अधिकाराचा संघर्ष सुरू अाहे. 


भरतसिंह साेळंकी यांच्या भूमिकेवर टिप्पणी? 
- जाणीवपूर्वक संभ्रमाची स्थिती निर्माण करण्यात अाली अाहे. अाता काही टिप्पणी करणे याेग्य नाही. काँग्रेससाेबत अारक्षणाच्या मुद्द्यावर जी चर्चा झाली त्याचा तपशील याेग्य वेळी जाहीर करीन. 


काँग्रेसशी काही चर्चा, संवाद झाला अाहे? 
- हाेय, काँग्रेसशी फाेनवर अाॅफिशियल चर्चा झाली. काँग्रेस अारक्षण कसे देऊ शकते यासंदर्भात सर्व कागदपत्रे त्याच्या तपशिलासह पाठवली. अारक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच घाेषणा करणार अाहे. तिकीट वाटप हा काही माेठा मुद्दा नाही. 

 

अारक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका काय? 
- पाटीदारांना अारक्षण देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सकारात्मक अाहे. ‘पास’देखील या फाॅर्म्युल्यावर सहमत अाहे. केवळ अाैपचारिक घाेेषणा व्हायची अाहे. 


भाजपला काेण खुश करू पाहताे? 
- बरेच लाेक अाहेत, याेग्य वेळ अाल्यावर त्यांची नावे सांगेन. जनता सगळे पाहत अाहे. अाता या वेळी लाेक मूर्ख बनणार नाहीत. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा... सर्व अांदाेलने काँग्रेसप्रेरित अाहेत- उपमुख्यमंत्री नितीन पटेल...


 

बातम्या आणखी आहेत...