आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणूक: शंकरसिंह वाघेलांचा कपडवंज बालेकिल्ला काेण सांभाळणार?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा बालेकिल्ला मानला जाताे हा मतदारसंघ. परंतु या मतदारसंघात सतत बदल हाेत अाला. मागील पाच निवडणुकांत तीन वेळा भाजप अाणि दाेन वेळा काँग्रेसचा विजय झाला. २०१२ मध्ये येथून विजयी झालेले शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस अाणि भाजपला साेडचिठ्ठी देऊन तिसऱ्या अाघाडीची स्थापना केली.

 

बापूंच्या गैरहजेरीत या मतदारसंघात भाजप अाणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर हाेणार असे दिसते. कपडवंज नावाने लाेकसभा अाणि विधानसभा मतदारसंघ हाेते त्या वेळी त्यास फारशी किंमत नव्हती. परंतु सीमांकन झाल्यानंतर लाेकसभा मतदारसंघातून ताे बाहेर पडला अाणि कपडवंजच्या एेवजी कठताल तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात अाला. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दमदार नेते शंकरसिंह वाघेला यांनी निकटचे प्रतिस्पर्धी कनूभाई डाभी यांना ६५६७ मतांनी पराभूत केले हाेते. शंकरसिंह वाघेला यांनी या मतदारसंघाला काँग्रेसला बालेकिल्ला बनवले हाेते. परंतु वाघेला यांनी काँग्रेसला साेडचिठ्ठी दिल्यानंतर येथील समीकरणे बदलली. २०१७ च्या निवडणुकीत भाजप-काँग्रेस काेणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शंकरसिंह वाघेला यांना माेठ्या प्रमाणावर मते खाणारा म्हणून पाहिले जात अाहे. याचा भाजपला फायदा हाेईल, असे राजकीय जाणकारांचे मत अाहे. 


लाेकसभेत प्रभाव

कपडवंज विधानसभाच म्हणून नव्हे, तर लाेकसभा मतदारसंघातदेखील शंकरसिंह वाघेला यांचा प्रभाव अाहे. २००४ च्या लाेकसभा निवडणुकीत १.१० लाख मतांपैकी ६५,९६५ मते वाघेलांना मिळाली हाेती. २००९ मध्ये दिनशा पटेल यांनी निवडणूक लढवली हाेती. 

क्षत्रिय, मुस्लिम मतदारांचा माेठा जनाधार 
क्षत्रिय अाणि मुस्लिम मतदारांचा येथे मजबूत जनाधार अाहे. सर्व समीकरणांचा अाढावा घेऊनही राजकीय पक्ष येथे उमेदवार निश्चित करतात. येथे सातत्याने विजयाच्या मताधिक्यात बदल हाेत अाला अाहे. २००२ मध्ये विमल शहा (भाजप), २००७ मध्ये मणीभाई पटेल (काँग्रेस) विजयी झाले हाेते. परंतु या वेळी दाेघेही तुल्यबळ नेते एकाच पक्षात असल्यामुळे निराळे राजकीय समीकरण पाहायला मिळेल.

 

भाजपतर्फे काेण? 
कपडवंज मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री विमल शहा, कठलालचे कनूभाई डाभी, मणीभाई पटेल, करडियाचे विजयभाई पटेल यांची नावे चर्चेत अाहेत. 


काँग्रेसतर्फे काेण? 
काँग्रेसतर्फे कठलालचे कालूसिंह डाभी, एमटी झाला, महेंद्रसिंह चाैहान, वासुदेव ब्रह्मभट्ट, नरेंद्रसिंह चाैहान यांपैकी एकास उमेदवारी दिली जाऊ शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...