आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणूक: 21 मतदारसंघांत काट्याची लढत; कमी मताधिक्यामुळे काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- गुजरात विधानसभा निवडणूक निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले अाहे. भाजपसाठी जेथे गुजरात माॅडेलची कसाेटी लागणार अाहे तेथे काँग्रेस गुजरातेतून २०१९ ची लाेकसभा निवडणूक जिंकण्याच्या तयारीला लागली अाहे. अर्थातच काँग्रेससाठी हा मार्ग तितकासा साेपा नाही. 

 

१२ व्या विधानसभा निवडणूक निकालाकडे पाहिले तर काँग्रेसला १८२ जागांपैकी केवळ ६१ जागांवर विजय संपादन करता अाला हाेता. ६१ पैकी निम्म्या जागांवरील मताधिक्य १० हजारपेक्षाही कमी हाेते. ५ हजारपेक्षाही कमी मतांच्या फरकाने काँग्रेसने २१ जागा जिंकल्या हाेत्या. म्हणजेच अापली प्रतिष्ठा शाबूत राखण्यासाठी काँग्रेसला केवळ जागा जिंकणे इतकेच महत्त्वाचे नाही तर कमी मताधिक्याने जिंकलेल्या जागा राखणेदेखील माेठे अाव्हान ठरणार अाहे. द. गुजरातमधील बहुतेक जागांवर भाजपने कब्जा केला अाहे. दाेनचा अपवाद वगळता अन्य सर्व जागांवर २० हजारपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजप उमेदवार विजयी झाले अाहेत. केवळ डांगमध्ये काँग्रेसने २४२२ मतांनी विजय मिळवला हाेता. 


भाजप खासदार सी. अार. पाटील म्हणाले, भाजप ज्या जागांवर कमी फरकाने जिंकला किंवा पराभूत झाला त्या साऱ्या केंद्रांवर तयारी केली जात अाहे.  त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. काँग्रेस नेते तुषार चाैधरी म्हणाले, ज्या जागांवर काँग्रेस उमेदवाराने कमी मताधिक्याने विजय मिळवला हाेता तेथील प्रत्येक केंद्रावर विशेष लक्ष दिले जात अाहे. 

 

डांगमध्ये १९९५ ला काँग्रेस पक्षाला २० हजारांचे मताधिक्य

कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या डांगमध्ये विजयाचे मताधिक्य सातत्याने घसरणीला लागले अाहे. १९९५ मध्ये सुमारे २४,७९८ मताधिक्य मिळाले. त्यानंतर १९९८ मध्ये ४६१५ मतांनी विजय मिळाला. भाजप तेव्हा तिसऱ्या क्रमांकावर हाेता. २००२, २००७ साली भाजपचा विजय झाला. मात्र मताधिक्य ७८८३ राहिले. २०१२ मध्ये काँग्रेस उमेदवार मंगला गावित यांनी भाजपला २४२२ मतांनी पराभूत केले. त्यामुळे डांग वाचवणे काँग्रेससाठी अाव्हानच अाहे. 

 

 

हे घटक ठरणार अाव्हान

> अादिवासी : गेल्या २२ वर्षांत काँग्रेसची पारंपरिक व्हाेट बँक भाजपकडे वळली अाहे. डांगमध्ये अत्यल्प मताधिक्याने झालेला विजय हे त्याचे द्याेतक अाहे. 

 

 

> माेठा चेहरा नाही : काँग्रेसमध्ये राज्यस्तरावर उत्तुंग प्रतिमा असलेला नेता नाही, ज्याकडे लाेक भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू शकतील. पक्षदेखील खंबीरपणे उभा राहत नाही. 

 

> पाटीदार : पाटीदार अांदाेलनानंतर भाजपविराेध काँग्रेससाठी शुभ संकेत मानला गेला. परंतु अलीकडचे वास्तव लक्षात घेता त्यात बरीच खळखळ दिसते. 

 

> गटबाजी : उमेदवारी वाटपाच्या वेळी नेत्यांमधील सुंदाेपसुंदी चव्हाट्यावर अाली. सुरतसारख्या जिल्हाध्यक्षाने दिलेला राजीनामा हा माेठा धाेकादायक संकेत अाहे. 

 

अवघ्या एका जागेवर ५० हजारांचे मताधिक्य

२०१२ मध्ये ५० हजारांचे मताधिक्य राखून काँग्रेसचा केवळ एकमेव उमेदवार विजयी झाला. खेडब्रह्मा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार अश्विन काेटवाल ५०,१३७ मतांनी विजयी झाले हाेते. 

 

हे ही वाचा...
सत्तेवर आल्यास स्वतंत्र मत्स्य खाते सुरू करू; राहुल गांधी यांनी साधला मासेमारांशी संवाद...

भाजपची दुसऱ्या फेरीसाठी 13 उमेदवारांची पाचवी यादी केली जाहीर; दोन आमदारांना वगळले​...

बातम्या आणखी आहेत...