आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातेत पत्नीऐवजी सुनेला तिकीट दिल्याने भाजप खासदार नाराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- भारतीय जनता पक्षाने पत्नीऐवजी सुनेला तिकीट दिल्याने खासदार प्रभातसिंह चौहान नाराज झाले आहेत. पक्षाने उमेदवार न बदलल्यास पक्षालाच  विजय मिळेल याची खात्री देता येत नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.  त्यांनी पत्नीसाठी  कालोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. भाजपने शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पक्षाने आमदार अरविंदसिंह चौहान यांना उमेदवारी नाकारली. त्याऐवजी पंचमहाल जिल्ह्यातील कालोल मतदारसंघात प्रभातसिंह यांच्या सुनेला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खा. चौहान यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून नाराजी कळवली आहे. प्रभातसिंह हे राजपूत समाजाचे मोठे नेते आहेत.

बातम्या आणखी आहेत...