आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासू-सुनेच्या भांडणामुळे त्रस्त भाजप खासदाराची अमित शहांकडे धाव!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेवरा- कालाेल विधानसभा मतदारसंघात ३५ वर्षे वयाची सासू अाणि ५० वर्षे वयाची सून यांच्या कथित भांडणामुळे त्रस्त झालेले खासदार प्रभातसिंह चाैहान यांनी थेट भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे धाव घेतली अाहे. विधानसभेसाठी उमेदवारी मागत असलेल्या सून अाणि अाणि स्वत:च्याच मुलावर त्यांनी गंभीर अाराेप करीत उमेदवार बदलण्याचे साकडे घातले अाहे.

 

पंचमहाल लाेकसभा मतदारसंघाचे खासदार प्रभातसिंह चाैहान यांच्याच कार्यक्षेत्रात कालाेल विधानसभा मतदारसंघ येताे. या विधानसभा मतदारसंघासाठी त्यांची चाैथी पत्नी ३५ वर्षांची रंगेश्वरी चाैहान हिच्यासाठी त्यांनी तिकीट मागितले हाेते. पाचव्या यादीत येथून त्यांचा मुलगा प्रवीणसिंह चाैहान यांची पत्नी सुमनबेन (५०) यांना उमेदवारी देण्यात अाली. घरातील भांडण चव्हाट्यावर अाले. रंगेश्वरीने अापल्या फेसबुक पाेस्ट मध्ये सुनेसाठी प्रचार करूनच दाखवा असा दम पतीला भरला. मीच सक्षम उमेदवार अाहे. त्यांच्या सुनेचे नावदेखील मतदार यादीत नाही, असे रंगेश्वरी यांनी म्हटले.

 

खासदार पत्नी अपक्ष लढणार 

रंगेश्वरीबेन या अपक्ष निवडणूक लढवण्यास उतावीळ झालेल्या अाहेत. सुनेला तिकीट मिळाल्यामुळे त्या खूप नाराज झाल्या अाहेत. खा.लीलाधर वाघेला यांनी अापल्या मुलासाठी उमेदवारी मागूनही मिळाली नाही. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, आनखी माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...