आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाटीदारांना आरक्षण कसे देणार? काँग्रेसने आराखडा दाखवावा; भाजपचे मंत्री रविशंकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- काँग्रेस पक्ष पाटीदार समुदायाची आरक्षणावरून दिशाभूल करत आहे. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित केली आहे. मग त्याव्यतिरिक्त पाटीदारांना आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसने त्याचा आराखडा दिला पाहिजे, असे आव्हान मंत्री रविशंकर यांनी दिले आहे.  


काँग्रेसने आरक्षणाबाबत १९९२ पासून नुसतीच चर्चा केली आहे. वेळोवेळी केवळ संधिसाधूपणा केला आहे. आताही काँग्रेसने आगामी गुजरात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी म्हणजे पाटीदारांची मते मिळवण्यासाठी आरक्षणाचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर एवढ्या वर्षांनंतरही काँग्रेसने राजकीय संधिसाधूपणा सोडलेला नाही. हे तर अति झाले. परंतु काँग्रेस त्यानंतरही पाटीदारांना आरक्षण देण्याची भाषा करत असल्यास त्यांनी त्याचा आराखडा जाहीर केला पाहिजे. काँग्रेसने जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम केले नाही तर काय ? ,  असे रविशंकर म्हणाले. ते मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.   गेल्या आठवड्यात हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा देताना आरक्षण देण्याची तयारी दर्शवल्याचे सांगितले होते.  न्यायालयाने कोट्यासंबंधी काही निश्चित निर्देश दिले आहेत. परंतु त्याचे स्वरूप ‘सल्ल्यासारखे’आहे, असे ते म्हणाले होते.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, आश्वासनांवरील चर्चेपासून मोदी दूर पळू लागले; काँग्रेसचा घणाघात...

बातम्या आणखी आहेत...