आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणुक: 2012 च्या तुलनेत दोन्ही पक्षांनी महिला उमेदवारांची संख्या घटवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- राजकीय पक्ष नेहमी महिला सक्षमीकरणाबद्दल भरभरून बोलत असतात. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतही महिलांना जास्तीत जास्त तिकिटे देण्याची चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र २०१२ च्या तुलनेत २०१७ मधील महिला उमेदवारांची संख्या घटलेली आहे. २०१२ मध्ये भाजपने १८ महिलांना उमेदवारी दिली होती, तर २०१७ मध्ये केवळ १२ महिलांनाच उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीत १३ महिलांना उमेदवारी दिली होती, तर यंदा १० महिलांनाच उभे केले आहे. 


२०१२ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने एकूण ३१ महिला उमेदवारांना तिकीट दिले होते. त्यापैकी १६ महिलांचा विजय झाला होता, तर १५ पराभूत झाल्या होत्या. ३१ पैकी भाजपने १८ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी १२ विजयी झाल्या व ६ पराभूत झाल्या होत्या.  काँग्रेसने १३ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी ४ विजयी ठरल्या होत्या.  
मोरवा हडप येथील जागेवर मागील वेळी काँग्रेसच्या सविताबेन विजयी झाल्या होत्या. मात्र निकाल घोषित होण्याच्या दिवशीच त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली तेव्हा भाजपच्या महिला उमेदवार निमिषाबेन सुथार 
विजयी झाल्या. या वेळी मात्र दोन्ही पक्षांनी मिळून एकूण २२ महिलांनाच उमेदवारी 
दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...