आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणुक : बालेकिल्ल्यासाठी दोन्ही पक्षांची राजस्थानमधील नेत्यांवर मदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. जुने बालेकिल्ले वाचवण्यासाठी भाजपचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ काबीज करण्याच्या हट्टाला पेटली आहे. गुजरातचे बालेकिल्ले वाचवण्यासाठी तसेच ते काबीज करण्याची जबाबदारी राजस्थानच्या दोन नेत्यांवर टाकण्यात आली आहे. राजस्थानमधील तानाबाना येथील भाजपचे भूपेंद्र यादव यांच्यावर बालेकिल्ला वाचवण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे, तर भाजपचे बालेकिल्ले काबीज करण्यासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर काँग्रेसने धुरा सोपवली आहे. त्यामुळे या दोन्ही राजस्थानी नेत्यांपैकी कुणाची रणनीती प्रभावी ठरते हे १८ डिसेंबर रोजी पाहायला मिळेल. महत्त्वाच्या जागांमुळे हे दोन्ही चेहरे चर्चेत असतील.  


माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत हे दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये ठाण मांडून आहेत. गुजरातच्या प्रत्येक भागात जाऊन मतदारांना काँग्रेसकडे आकृष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या दौऱ्याचे आयोजनही गहलोत यांच्या नियोजनानुसारच सुरू आहे.  पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला फोडायचे हे सर्व निर्णयही गहलोत घेत आहेत. हार्दिक पटेलला काँग्रेसशी जोडण्यातही गहलोत यांची महत्त्वाची भूमिका आहे असे मानले जात आहे. भाजपचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी भूपेंद्र यादव शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशोक गहलोत यांचा प्रत्येक वार पलटवून लावत पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. यामुळे भूपेंद्र यादव यांनीदेखील राजस्थानमधील मंत्री आणि दिग्गज भाजप नेत्यांना गुजरातला निमंत्रित केले आहे.  गुजरातमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यास अशोक गहलोत यांचे पक्षातील वजन निश्चित वाढणार आहे. केवळ गुजरात नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर त्यांची भूमिका अधोरेखित होईल.  तसेच गुजरातमध्ये भाजप विजयी झाल्यास भूपेंद्र यादव यांची प्रतिष्ठाही वाढेल. गुजरात निवडणुकांनंतर त्यांच्याकडे इतर राज्यांमधील निवडणूक प्रचाराची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. एकूणच दोन्ही नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीवर या निकालांचा परिणाम होईल.

बातम्या आणखी आहेत...