आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक; भाजपला लाेकसभेत मिळालेल्या मतांपैकी 18% मते वळवली तरच काँग्रेसचा विजय!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद -  गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजप सत्तारूढ हाेईल की २२ वर्षांनंतर काँग्रेसचे पुनरागमन हाेईल, १८ डिसेंबर राेजी याविषयीचा निर्णय हाती येईपर्यंत भाजप अाणि काँग्रेस या दाेन्ही पक्षांकडे समान संधी असल्याचे दिसून येत अाहे. मागच्या चार निवडणुकांमध्ये दाेन्ही पक्षांच्या मतांमध्ये अवघ्या ९ टक्क्यांचा फरक हाेता. त्यामुळेच जागांमध्येदेखील दुपटीचा फरक पाहायला मिळाला. १९९५ मध्ये काँग्रेसला ३२.९ अाणि भाजपला ४२.५% मते मिळाली हाेती. याच फरकामुळे भाजपला सत्ता संपादन करणे शक्य झाले हाेते. १९९५ मध्ये भाजप अाणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांमधील फरक हा १०% पेक्षा अधिक नव्हता. अशा परिस्थितीत जर ४ ते ५ टक्के नव्या मतदारांना काँग्रेस अापल्याकडे वळवू शकली तर दाेन्ही राजकीय पक्षांमध्ये अगदी काट्याची टक्कर पाहायला मिळेल. काँग्रेसला अाेबीसी, पाटीदार अाणि दलितांकडून खूप अपेक्षा अाहेत. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भाजप किती मजबूत...

बातम्या आणखी आहेत...