आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांदाेलनांमुळे सत्तांतर : 80 च्या दशकात भ्रष्टाचार, 90 च्या दशकात अारक्षणाचेे हादरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- अारक्षणाच्या मुद्द्यावरून पाटीदार समाजाने सुरू केलेल्या अांदाेलनाचा परिणाम या विधानसभा निवडणुकीवर कितपत झाला  हे निकालानंतर स्पष्ट हाेईलच; परंतु गुजरातचा राजकीय इतिहास पाहता प्रत्येक माेठ्या अांदाेलनानंतर सत्तारूढ पक्षाला सत्ता गमावावी लागली असेच दिसून येते. गुजरात राज्याची स्थापना झाल्यानंतर महागाई अाणि अारक्षणाच्या मुद्द्यावरून माेठी अांदाेलने झाली. या अांदाेलनामुळेच गुजरातचा मुख्यमंत्री बदलावा लागला, परंतु काही फायदा झाला नाही. सरकार सत्ता टिकवू शकले नाही. 


मुंबईपासून स्वतंत्र गुजरात राज्याच्या मागणीवरून अांदाेलन करण्यात अाले हाेते. अांदाेलनानंतर १९६१ मध्ये नव्या राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर गुजरातमध्ये दाेन माेठी अांदाेलने झाली. त्यामुळे काँग्रेसला सत्ता गमावावी लागली. ८० च्या दशकात भ्रष्टाचार अाणि महागाईच्या विराेधात जनअांदाेलन पेटले. ९० च्या दशकात अारक्षणावरून अांदाेलन सुरू झाले. दाेन्ही अांदाेलनांचा परिणाम गुजरातमधील सत्तारूढ सरकारवर झाला.


 काँग्रेसला जनाधार मिळाला नाही. त्यामुळे सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. काँग्रेसला केवळ ३३ जागांवर समाधान मानावे लागले हाेते. याच दृष्टिकाेनातून राजकीय विश्लेषक पाटीदार अांदाेलनाकडे पाहत अाहेत. 

 

१९७४ मध्ये चिमणभाई पायउतार 
१९७३ मध्ये काँग्रेसला माेठा जनाधार मिळाला. चिमणभाई पटेल मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळातील वाढता भ्रष्टाचार अाणि महागाईच्या मुद्द्यावरून जनसंघाने नवनिर्माण अांदाेलन डिसेंबर १९७४ मध्ये सुरू केले. हे अांदाेलन दडपून टाकण्याचे प्रयत्न झाले. त्यात १०० जण बळी पडले, तर ३ हजार पेक्षाही अधिक लाेक जखमी झाले हाेते. अखेर चिमणभाई पटेल यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. १९७५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाला अाणि जनता दल, जनसंघ, समाजवादी पार्टीचे सरकार सत्तेवर अाले. 

 

१९८५ मध्ये काँग्रेस सत्तेला मुकली 
जन अांदाेलनाचा दुसरा अध्याय अारक्षण अांदाेलनाचा हाेता. यामुळे माधवसिंह साेलंकी सरकारची ‘खाम’ थियरीदेखील अपयशी ठरली. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला हाेता. १९८५ मध्ये अारक्षणाच्या मुद्द्यावरून अांदाेलनाची ठिणगी पडली हाेती. त्या वेळी भाजपचे युवा नेते नरेंद्र माेदी यांनी नेतृत्व केले हाेते. १९८० मध्ये साेलंकी यांनी ‘खाम’ थियरीच्या बळावर काँग्रेसला १४१ जागा मिळवून दिल्या. त्यानंतर  १९८५ मध्ये १४९ जागा मिळाल्या. परंतु अारक्षण अांदाेलनाचे हादऱ्यांनी सरकार हादरले. अमरसिंह चाैधरी मुख्यमंत्री बनले, परंतु १९९० च्या निवडणुकीत अवघ्या ३३ जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले.

बातम्या आणखी आहेत...