आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साैराष्ट्र-कच्छच्या 54 जागांवर पाटीदार निर्णायक; 6 काेटी लाेकसंख्येपैकी 12 टक्के पाटीदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- १९८० च्या दशकापासून पाटीदार समाज हा भाजप मतदार राहिलेला अाहे. साैराष्ट्र-कच्छ मधील ५४ मतदारसंघांत पाटीदारांचा मजबूत जनाधार अाहे. ‘सीएसडीएस’ने केलेल्या पाहणीनुसार २०१२ च्या निवडणुकीत ७५ टक्के पाटीदारांनी भाजपच्या बाजूने काैल दिला हाेता. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीतही पाटीदार भाजपच्या साेबत हाेते. २०१५ च्या अारक्षण अांदाेलनानंतर पाटीदारांवरील भाजपची पकड सैल हाेत राहिली. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसमाेर पाटीदारांची नाराजी दूर करण्याचे माेठे अाव्हान अाहे, तर पाटीदारांची भाजपवरील नाराजी अापल्या पथ्यावर कशी पडेल यासाठी काँग्रेसकडून त्यांना राजी करण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. येत्या ९ डिसेंबरला साैराष्ट्र-कच्छमधील ५४ मतदारसंघांत मतदान हाेणार अाहे.

 

कच्छ भाजपचा बालेकिल्ला मानला जाताे. येथे ६ जागा अाहेत. २००७ अाणि २०१२ मध्ये भाजपने ५-५ जागा जिंकल्या हाेत्या. २०१२ च्या पाेटनिवडणुकीत अबडासा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला. १९८५ मध्ये १८२ पैकी १४९ जागा जिंकून काँग्रेसने सत्ता काबीज केली हाेती. त्यानंतर मात्र स्वबळावर सत्ता संपादन करणे काँग्रेसला कठीण बनले. 

 

> निवडणूक जिंकण्यासाठी पाटीदारांचे पाठबळ अावश्यक 

 

वर्चस्वाची लढाई 

निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस अाणि भाजप दाेन्ही पक्ष अापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दंड ठाेकून उभे अाहेत. काँग्रेसचा पराभव तिला मृत्युशय्येवर घेऊन जाणार ठरेल, तर भाजपचा पराभव हा विकासाचा पराभव मानला जाईल. हार्दिक पटेल अाणि जिग्नेश पटेलसारखे नेते जनाधार शाेधू न शकल्यामुळे एखाद्या पक्षाशी जवळीक करतील.

 

२०१२ मध्ये पाटीदार भाजपला दुरावले, साैराष्ट्रातील ७ जागा गमावल्या 

२०१२ मध्ये केशुभाई पटेल यांच्यामुळे भाजपने २३ जागा गमावल्या हाेत्या. गुजरात परिवर्तन पक्षाला केवळ २ जागा अर्थात ३.९ टक्के मते मिळाली हाेती. साैराष्ट्रातील ७ मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला हाेता. उल्लेखनीय म्हणजे केशुभाईंच्या बंडखाेरीपेक्षाही पाटीदार अांदाेलनाचे स्वरूप अधिक उग्र हाेते. २०१२ मध्ये साैराष्ट्रात भाजपला ७.९ टक्के मते मिळाली हाेती. २०१७ च्या निवडणुकीत ३ ते ४ टक्के मतांच्या फरकाने भाजपला जबर फटका बसू शकताे. 

 

डॅमेज कंट्राेलची तयारी 

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी १८२ उमेदवारांची यादी निश्चित केली. त्यापैकी काँग्रेसच्या ४ बंडखाेरांसह ७० उमेदवारांची यादी घाेषित केली. येत्या दाेन दिवसांत अन्य उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार अाहेत. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी डॅमेज कंट्राेलची तयारी सुरू केली अाहे. याशिवाय भाजपने अाेबीसी, अादिवासी अाणि दलितांच्या मतांवर लक्ष केंद्रित केले अाहे. दक्षिण गुजरात, मध्य गुजरात अाणि उत्तर गुजरातमधील अमित शहा यांच्या दाैऱ्याच्या वेळी या समाजघटकातील नेत्यांच्या उपस्थितीवर प्रामुख्याने लक्ष देण्यात अाले हाेते. तसेच दलित-अादिवासी समाजाच्या नेत्यांशी त्यांनी चर्चादेखील केली.

 

अांदाेलनानंतरच्या निवडणुकीची स्थिती 

पाटीदार अांदाेलनानंतर साैराष्ट्र-कच्छमधील ४ जागांवर पाेटनिवडणूक झाली त्यापैकी विसावदर, अबडासा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला हाेता. साैराष्ट्रातील ८ पैकी एक जिल्हा परिषददेखील काँग्रेसच्या ताब्यात गेली. याशिवाय २३ जिल्हा परिषद अाणि ११३ पंचायत समित्यांवर काँग्रेसचाच विजय झाला हाेता. या पंचायतींच्या निवडणूक निकालांचा विचार करता या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पाटीदारबहुल भागांवर भाजपचे विशेष लक्ष दिसते. 

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, आनखी माहिती...

बातम्या आणखी आहेत...