आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणुक; भाजप एकाच वेळी 60 लाख लोकांच्या संपर्कात; काँग्रेस 50 हजारांपर्यंतच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष समाज माध्यमांवर सक्रिय झाले आहेत. भाजप एकीकडे काँग्रेसच्या ६० वर्षांतील कामगिरीवर टीका करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून व्यावसायिकांचे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी समाज माध्यमांवर आपापले कंपू तयार केले आहेत. दोन्ही पक्षांचे विशेष दल व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरवर सतत सामग्री अपडेट करत आहेत. भाजपच्या दाव्यानुसार त्यांचा आयटी विभाग एकाच वेळी सहा लाख लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो. तर काँग्रेसने समाज माध्यमांद्वारे ५० हजार लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो, असा दावा केला आहे. भाजपच्या सुरत आयटी सेलचे प्रभारी पीव्हीएस शर्मा म्हणाले की, विविध तज्ज्ञांसह ७०० जण या विभागात सक्रिय आहेत. तर काँग्रेसचे विनीत सिंह म्हणतात, त्यांचा पक्ष भाजपसारखे खासगी संस्थेद्वारे समाज माध्यमांवर प्रचार करत नाही, तर त्यांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक विविध माध्यमांद्वारे मतदाराच्या संपर्कात आहेत. 

 

>  सुरतमधील दर २० जागांवर सत्ताधारी पक्षांचे लक्ष 
> समाजमाध्यमांद्वारे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न 

> २० भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक जागेवर तैनात, काँग्रेसमध्ये दोघांवर संपूर्ण जबाबदारी

> १२ मतदारसंघांसाठी काँग्रेस व  भाजपने फेसबुक पेज केले आहेत.

> १५ हजार मतदार मागील महिन्यात भाजपशी फेसबुकद्वारे जुळले 

> ३५ हजार फॉलोअर्स काँग्रेसच्याही फेसबुक पेजवर 

> ०३  लाख फॉलोअर्स भाजपच्या हर्ष संघवी यांचे 

> २०० दोन्ही पक्षांतील प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपचे.

 

पुढील स्‍लाइडवा वाचा, 
राजकीय पक्षांचा आयटी विभाग कसा काम करतो?... 
मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती ...

 

बातम्या आणखी आहेत...