आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक; 1980 मध्ये बिनविराेध निवडले गेले एकमेव उमेदवार महंत विजयदास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- गुजरात विधानसभेची निवडणूक लढवणे ही प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा बनली अाहे. परंतु याच गुजरातमध्ये असाही एक नेता हाेता, ज्याच्याविराेधात कुणी निवडणूक लढवलेली नव्हती. अाणीबाणीनंतर सत्तारूढ झालेल्या जनता दलाच्या सरकारमध्ये फाटाफूट झालेला ताे काळ हाेता. 


इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सातव्या लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसने ३५३ जागा पटकावून पूर्ण बहुमत मिळवले हाेते. त्यानंतर १९८० मध्ये निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. परंतु सर्वाधिक चर्चा राहिली ती पाेरबंदर जिल्ह्यातील कुतियाणा मतदारसंघाची. येथे काँग्रेसचे उमेदवार महंत विजयदास यांच्याविराेधात काेणी उमेदवार उभा राहिलाच नव्हता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात महंत एकमेव उमेदवार ठरले ज्यांच्याविराेधात काेणी निवडणूक लढवली नव्हती अाणि ते बिनविराेधरीत्या विधानसभेवर निवडून गेले हाेते. 
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात अातापर्यंत सर्वात कमी मतांच्या फरकाने झालेला विजय साैराष्ट्राच्या जामजाेधपूर मतदारसंघात नाेंदवला गेला. या जागेवर २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जाडेजा ब्रिजराजसिंह हिंमतसिंह यांनी भाजप उमेदवार चिमणभाई शपरिया यांना अवघ्या १७ मतांनी पराभूत केले हाेते. 

 

विजयाचा सन्मान : २ वेळा मंत्रिपद 
गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष महंत विजयदास यांनी १९८० मध्ये बिनविराेध निवडून येण्याचा विक्रम केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने माधवसिंह साेलंकी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद बहाल केले. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा १९८५ मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झाले त्या वेळी दुसऱ्यांदा राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देऊन त्यांचा गाैरव केला. याशिवाय १९८१-८५ पर्यंत गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडे साेपवले हाेते. १९९० मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला अाणि सार्वजनिक जीवनातून निवृत्ती पत्करली. 

 

बातम्या आणखी आहेत...