आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाॅवर अाॅफ पाटीदार’ चित्रपट काँग्रेस प्रदर्शित करू शकली नाही, अारक्षण कसे देणार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्दिक पटेलवर अाधारित चित्रपट  ‘पाॅवर अाॅफ पाटीदार’ प्रदर्शित करण्यास चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने परवानगी नाकारल्याने निर्मात्याने साकडे घातले आहे. - Divya Marathi
हार्दिक पटेलवर अाधारित चित्रपट ‘पाॅवर अाॅफ पाटीदार’ प्रदर्शित करण्यास चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने परवानगी नाकारल्याने निर्मात्याने साकडे घातले आहे.

सुरत- पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर अाधारित ‘हू नरेंद्र माेदी बनवा मांगू छू’ (मैं नरेंद्र माेदी बनना चाहता हूं) हा चित्रपट गुजरात निवडणुकीपूर्वी प्रदर्शित हाेत असल्याची बातमी थडकल्याने संतप्त झालेले ‘पाॅवर अाॅफ पाटीदार’चे निर्माते दीपक साेनी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अाणि हार्दिक पटेल यांना खरमरीत पत्र लिहिले. त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तिघांकडे मागणी केली. राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात, अापण हा निवडणूक मुद्दा बनवू पाहत अाहात, मात्र माझा चित्रपट हा काही निवडणूक मुद्दा हाेऊ शकत नाही, असे म्हटले अाहे. 


हरियाणात जाट अारक्षणाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सुरतमध्ये अालेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांनी म्हटले, काँग्रेसने हरियाणात ज्या पद्धतीने जाटांना अारक्षण दिले हाेते, त्याच धर्तीवर पाटीदारांना अारक्षण दिले जाईल. भाजप सरकारने न्यायालयात चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करून स्थगिती मिळवली अाहे. प्रश्न असा अाहे की, जर जाटांच्या अारक्षणावर न्यायालयाने स्थगिती दिली अाहे तर काँग्रेस येथे कशाच्या अाधारावर पाटीदारांना अारक्षण देणार अाहे. 


पाटीदारांच्या अारक्षणाचा फाॅर्म्युला अनिश्चित :  हरियाणातील काँग्रेस सरकारने जाटांसह ६ जातींना १० टक्के अारक्षण देण्याचा निर्णय घेतला हाेता. या निर्णयाच्या विराेधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, जाटांसह ६ जातींना दिले गेलेले अारक्षण निर्धारित सीमेच्या पलीकडे अाहे. सुप्रीम कोर्टाने अारक्षणाची मर्यादा ५० टक्के इतकी निश्चित केली अाहे. हायकोर्टाने जाटांच्या अारक्षणावर स्थगिती दिली. हुडा याच धर्तीवर पाटीदारांना अारक्षण देण्याचे म्हणत अाहेत. गुजरातमध्ये ४९ टक्के अारक्षण दिले जात अाहे तर हुडा काेणत्या अाधारावर अारक्षण देणार अाहेत, ते त्यांनी स्पष्ट केले नाही. 

बातम्या आणखी आहेत...