आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्तेवर आल्यास स्वतंत्र मत्स्य खाते सुरू करू; राहुल गांधी यांनी साधला मासेमारांशी संवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरबंदर- केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास स्वतंंत्र मत्स्य खाते सुरू केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. शुक्रवारी त्यांनी मासेमारांशी संवाद साधला. भाजप सरकारने मासेमारांच्या बोटींच्या इंधनाचे अनुदान बंद करून टाकले आहे. त्यावरून नाराजी निर्माण झाली आहे. मासेमारांचे काम शेतकऱ्यांसारखेच आहे. तुमच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असले तर ते विविध प्रकारच्या समस्यांची सोडवणूक करू शकेल. आमचे सरकार केंद्रात आले तर आम्ही तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करू, असे राहुल यांनी सांगितले. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना  त्यांनी टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, असा आरोपही त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...