आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: जैन, पाटीदार, राजस्थानी अाणि उत्तर भारतीय नेते काॅंग्रेस- भाजपच्या प्रचारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विकासाचा मुद्दा उचलून धरला आहे. ‘हुं छू विकास, हुं छू गुजरात’ चे नारे देत भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. काँग्रेसदेखील ‘काँग्रेस आवे छे’चा नारा देत विकास वेडा झाल्याचे ठसवून सांगत आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनानंतर गुजरातमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाने पुन्हा एकदा निवडणुकीला जात, धर्म आणि प्रादेशिकतेचे वळण मिळाले आहे. भाजप, काँग्रेस हे दोन्ही मोठे राजकीय पक्ष जात, समाज आणि प्रादेशिकतेच्या आधारे प्रचार करत आहेत.

 

 हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानीसारख्या तरुण नेत्यांचा उदयच गुजरातमध्ये उफाळलेल्या सामाजिक असंतोषातून झाला आहे. काँग्रेस आणि भाजपसाठी यंदाच्या निवडणुकीत जातनिहाय गणित जमवण्याशिवाय प्रचारासाठी इतर कोणताही ठोस मुद्दा नाही. सुरतमधील १२ जागांवर होणाऱ्या निवडणूक प्रचारांतून तर हेच स्पष्ट होते. 

 

हे ही वाचा,

आंदोलनांमुळे सत्तांतर : 80 च्या दशकात भ्रष्टाचार, 90 च्या दशकात आरक्षणाचे हादरे

मी नरेंद्रभाई नाही, माणूस आहे, चुका करतो! महागाईच्या चुकलेल्या हिशेबावर राहुल गांधींचे उत्तर

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, हिंदी भाषिक क्षेत्रांमध्ये राजनाथ, योगी आदित्यनाथ आणि जैन परिसरात मुख्यमंत्री रूपाणींचा दौरा...

बातम्या आणखी आहेत...