आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिझ सईदला का पकडले? कोर्टाची सरकारला विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदसह चार जणांना का पकडण्यात आले ? अशी विचारणा लाहोर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला केली आहे. न्यायमूर्ती सरदार मोहंमद शमिम खान यांच्या अध्यक्षतेखाली पिठाने एका याचिकेवरील सुनावणीत पंजाब सरकारला या प्रकरणात ७ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 
 
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड सईद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान अबिद, काझी काशिफ हुसेन व अब्दुल्ला उबैद यांनी लाहोर उच्च न्यायालयात मंगळवारी एक याचिका दाखल केली होती. त्यात घरात अटक करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. सरकारने ३० जानेवारी रोजी हाफिझ सईद अाणि इतर चार जणांना लाहोरमधील घरात स्थानबद्ध केले. आरोपींना  ९० दिवसांसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...