आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत असेल तर भाजपने माझ्याशी पंगा घ्यावा- हार्दिक पटेल; चारित्र्यहनन करून अारक्षणाला बगल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हार्दिक पटेलचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तशी शक्यता जाणवत आहे. याबाबत खुद्द हार्दिक पटेलचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी हार्दिक पटेलने व्हिडिओमध्ये असलेली व्यक्ती वेगळीच आहे, तो मी नाहीच. हा सर्व भाजपचा कट असल्याचे सांगत हार्दिकने याप्रकरणी वकिलांचा सल्ला घेणार असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पटेल म्हणाला,‘व्यक्तिगत पातळीवर मी कसाही असू शकेन, समजा मी खाेटारडा अाहे, परंतु पाटीदार समाजाच्या अारक्षणाच्या मुद्द्यावर मी जाे लढा सुरू केला अाहे त्याबाबत निश्चितच खरा अाहे.

 

जर सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी थेट माझ्याशी पंगा घ्यावा. जर व्यक्तिगत शत्रुत्व असेल तर मला ठार मारावे.’ माझ्या चारित्र्यावर शिंताेडे उडवून अारक्षणाच्या मूळ मुद्द्याला बगल देता येईल, असा भाजपचा भ्रम अाहे. परंतु समाजातील ज्येष्ठांपासून ते युवकांपर्यंत सगळ्यांचा दृष्टिकाेन अतिशय स्पष्ट असून ते सारे माझ्यासाेबत अाहेत. 

 

पुढील स्‍लाईडवर पाहा भाजपने विदेशात बनवली सीडी, ४० काेटींचा साैदा... 

 

बातम्या आणखी आहेत...