आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेलची माणसा सभा ऐनवेळी रद्द; अश्लील व्हिडिओ जारी झाल्यानंतर पहिलीच सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- गुजरातेत हार्दिक पटेल यांना गांधीनगर जिल्ह्यातील माणसा येथे सभा घेता आली नाही. प्रशासनाने त्यांना ऐनवेळी सभेची परवानगी  नाकारली. कथित अश्लील व्हिडिओ जारी झाल्यानंतर हार्दिक पटेल यांची ही पहिलीच सभा होती.  व्हिडिओ बनावट असल्याचे पुरावे आहेत, असा त्यांचा दावा होता.  हेच पुरावे ते माणसा येथील जाहीर सभेत (१८ रोजी) देणार होते. हार्दिक यांनी प्रशासनाने सभा रद्द केल्याने ही पोलिस  आणि प्रशासनाची गंुडगिरी असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.  ७ नोव्हेंबर रोजी माणसा येथे समितीचे संयोजक धर्मेश पटेल यांनी परवानगी मागितली होती. माणसाच्या इतिहासात प्रथमच  येथील मैदानाचे भाडे  आकारून जिल्हा प्रशासनाने सभेस मंजुरी दिली  पण शुक्रवारी सभेपूर्वीच ती रद्द करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...