आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक लढवण्यासाठी विनाहुंड्याची सून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैथल - हरियाणात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोरात आहे. कैथल जिल्ह्यातील बेगपूर गावातही सरपंच बनणे-बनवण्याचे राजकारण रंगात आले होते. चेहरेमोहरेही निश्चित झाले होते. परंतु राज्य सरकारच्या एका निर्णयाने सगळ्यांचाच मुखभंग झाला आहे. तीन हजार लोकसंख्येच्या या गावचे सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. सरपंच होणारी उमेदवार किमान आठवी पास तरी असलीच पाहिजे, अशी अट आहे.
त्यामुळे आधीपासूनच मैदानात उतरलेल्या तीन महिला उमेदवार रिंगणाबाहेर फेकल्या गेल्या. आता गेल्या पाच दिवसांपासून गावच्या गल्लीबोळात ‘सरपंच कोणाला करायचे?’ हीच चर्चा होत आहे. गावात अनुसूचित जातीची ५० कुटुंबे आणि १३७ मतदार आहेत. परंतु एकही आठवी पास महिला सापडत नव्हती. तेव्हा गावातल्याच पिंकीने ‘माझी लहान बहीण निर्मला आठवी पास आहे, परंतु ती धान लावण्यासाठी शेतात गेली आहे,’ असे सांगितले. निर्मलाला भेटल्यावर ती संगरोलीच्या सरकारी शाळेतून आठवी पास झाल्याचे कळलेे. हेे ऐकून लोकांचे चेहरे फुलले. ती बिनविरोध सरपंच होईल, असे सर्वांनाच वाटले. मात्र एक गट विरोधात गेला. वाल्मीकी समुदायाचे पंच दरिया म्हणाले, माझ्या दोन मुलांचे लग्न ठरले. दोन्ही सुना दहावी पास आहेत. दोन-चार दिवसांत बिनाहुड्यांचे लग्न उरकू. म्हणजे त्या सरपंचपदाची निवडणूक लढवू शकतील.

‘हामनै कौण सरपंच बणावैगा : निर्मला
सरपंचाची निवडणूक लढवशील का, असे निर्मलाला विचारले असता ती म्हणाली की,‘हामनै कौण सरपंच बणावैगा (मला कोण सरपंच करणार?) आम्ही रोजमजुरी करणारे निवडणुकीपासून दूरच राहतो. मुलांची पोटं भरायची आहेत.तरीही घरचे म्हणाले तर नक्की लढवीन.
अर्ज भरण्याआधी लग्न झाले तरच शक्य...
उमेदवारी अर्ज भरण्याआधी लग्न होऊन एखादी आठवी पास सून गावात आली तर ती निवडणूक लढवू शकते, असे जिल्हा विकास व पंचायत अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.
40 % आहे साक्षरता गुर्जरबहुल गावात केवळ ४० टक्के साक्षरता आहे. गावात प्राथमिक शाळा आहे, असे सरपंच राजसिंह यांनी सांगितले.