आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा लोक सकाळी हिंदू, दुपारी ख्रिश्चन अन् सायंकाळी मुस्लिम बनतील : हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- धर्मांतराबाबत काही विशिष्ट प्रक्रिया, नियम नसेल तर एखादा सकाळी हिंदू, दुपारी ख्रिश्चन आणि सायंकाळी मुस्लिम बनून जाईल, अशी टीका राजस्थान उच्च न्यायालयाने केली आहे. जोधपूरच्या  हिंदू युवती अन् मुस्लिम युवकाच्या लग्नावर शंका उपस्थित करत न्यायालयाने धर्मांतराच्या नियमांबाबत राज्य सरकारकडून उत्तर मागवले आहे. 
 
धर्मांतराबाबत कोणतीच प्रक्रिया नसल्याचे स्पष्टीकरण या प्रकरणाचे तपास अधिकारी अचल सिंह यांनी िदल्यानंतर न्यायाधीश गोपालकृष्णन यांनी खरमरीत टीका केली. ते म्हणाले, ‘विशिष्ट प्रक्रिया नसेल तर एखादा सकाळी हिंदू, दुपारी ख्रिश्चन व सायंकाळी मुस्लिम बनून जाईल. उद्याचालून मीसुद्धा म्हणेन की, मी गोपालकृष्णन नव्हे तर गोपाल मोहंमद आहे.
 
न्यायालयाने सरकारला याचे उत्तर ४ दिवसांत देण्याचा आदेश दिला असून पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होईल. प्राप्त माहितीनुसार, जोधपूरची पायल सिंघवी नामक युवती धर्मांतर करून आरिफा बनली होती. १३ एप्रिलला तिने फैज मोहंमद नामक मुस्लिम युवकाशी लग्न केले. मात्र, पायलचे अपहरण झाल्याचा आरोप करत तिच्या भावांनी हे लग्न रद्द करण्याची याचिका दाखल केली. परंतु पायलने कोणत्याही प्रकारची बळजबरी झाली नसल्याचे सांगत कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने तिची महिलागृहात रवानगी केली आहे.  
 
लग्नासाठी धर्मांतर म्हणजे लव्ह जिहाद : याचिका
युवतीचा भाऊ चिराग सिंघवीकडून वकील एम. आर. सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यांनी युक्तिवाद केला की, मी धर्मांतर केले, असे लिहून टाकणे मान्य नाही. १२ एप्रिल रोजी तिने इस्लाम धर्म स्वीकारला अाणि १३ एप्रिल रोजी लग्न केले. म्हणजेच फक्त लग्नासाठी धर्म बदलला. हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. त्यामुळे, धर्मांतर कधी आणि कोण करू शकते हे निश्चित व्हायला हवे, असेही त्यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...