आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी 200 किमी हायस्पीडसाठी सध्या देशात एकच मार्ग सक्षम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद - नवी दिल्ली- फरिदाबाद - मुंबई हा महामार्ग सध्या ताशी २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारा देशातील एकमेव मार्ग आहे. या मार्गावर स्पेनच्या टॅल्गो या हायस्पीड रेल्वेतून प्रवासी जूनमध्ये प्रवास करू शकतील. त्यामुळे अवघ्या १२ तासांत िदल्ली - मुंबई प्रवास पूर्ण होऊ शकणार आहे. १५ मे नंतर या ट्रेनच्या दोन चाचण्या होणार आहेत.

उत्तर रेल्वेच्या सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार २१ एप्रिल रोजी स्पेनहून मुंबईच्या बंदरामध्ये या ट्रेनच्या १६ डब्यांचे रॅक पोहोचणार आहेत. त्यानंतर मेमध्ये या रेल्वेच्या दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्या यशस्वी ठरल्यास जूनमध्ये दिल्ली - मुंबई मार्गावर हायस्पीड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता आहे. अर्थात सध्या केवळ याच मार्गावरील प्रवासी या वेगवान रेल्वेसेवेचा आनंद घेऊ शकतील. तथापि सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार फरिदाबाद मार्गावर नवी रेल्वे चाचणी पूर्ण होईपर्यंत ही रेल्वे सेमी हायस्पीडप्रमाणे ताशी १२० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावू शकणार नाही. दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ट्रेनवरील वेगमर्यादेचे बंधन टप्याटप्प्याने शिथिल केले जाईल. अतिशय कमी वेळेत ही ट्रेन ताशी २०० किलोमीटर वेगाने धावू शकेल, असा विश्वास रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला.
देशातील एकमेव मार्ग सक्षम : ताशी २०० किलोमीटर वेगाने हायस्पीड ट्रेन धावण्यासाठी तूर्तास रेल्वेकडे मुंबई - फरिदाबाद - दिल्ली हा एकमेव रूट सक्षम आहे. त्यामुळे हायस्पीड ट्रेनसाठी याच मार्गाची िनवड करण्यात अाली आहे. शिवाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही हा मार्ग फायद्याचा व सोयीचा ठरू शकतो. फरिदाबाद विभागाचे अभियंता जयलाल मीणा यांच्या माहितीनुसार या मार्गावर २०० किलोमीटर वेगाने ट्रेन आरामात धावू शकते. त्यात असलेल्या अनेक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. परंतु ट्रॅकवर माणसे, पशू येऊन अडथळे िनर्माण करू शकतात. त्यामुळे तूर्तास वेगमर्यादेचे बंधन घालण्यात आले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मेट्रो शहरांतील प्रवासाचा कालावधी कमी होणार... मेमध्ये होणार
दोन चाचण्या